मुकाअ एम. मुरूगंनाथम
गोंदिया (Zilla Parishad) : जिल्हा परिषदेच्या आस्थापना विभागात (Establishment Division) कार्यरत लिपिकांच्या कार्यप्रणालीत गती यावी, या दृष्टीकोनातून काही महिन्यापूर्वीच जिल्हा परिषदेचा कार्यभार सांभाळणारे मुख्य कार्यपालन अधिकारी एम. मुरूगंनाथम यांनी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले. दरम्यान प्रशिक्षणानंतर कामाची पडताळणी परीक्षा घेण्यात आली. ५० गुणांच्या परिक्षेत ४० लिपीकांनी अपेक्षानुरूप गुण प्राप्त केले नाही. त्यामुळे मुकाअ मुरूगंनाथम यांनी नाराजी व्यक्त करीत कार्यसनमध्ये सर्व कर्मचार्यांनी पारंगत रहावे, अशा सुचना केल्यात. या उपक्रमामुळे जिल्हा परिषद कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहेत.
ग्रामीण भागातील जनतेचा थेट संबध
जिल्हा परिषद (Zilla Parishad) ही संस्था जिल्ह्याची मिनी मंत्रालय म्हणून ओळखली जाते. या संस्थेच्या माध्यमातून तथा संस्थेच्या विविध विभागातून ग्रामीण भागात योजना, उपक्रमांची अंमलबजावणी व विकासकामे केली जातात. ग्रामीण भागातील जनतेचाही या संस्थेशी थेट संबध असतो. मात्र (Zilla Parishad) जिल्हा परिषद यंत्रणेतील ढिसाळ कामकाजामुळे या संस्थेला ‘झोलबा पाटलाचा वाडा’ असेही संबोधले जाते. संस्थेत कामे गतिमान व्हावे, प्रत्येक कर्मचारी कार्यदक्ष राहून कार्यसनात पारंगत रहावे, या उद्देशाने मुकाअ एम.मुरूगंनाथम यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील आस्थापनेत कार्यरत लिपीकांची प्रशिक्षण कार्यशाळा घेण्याचे ठरविले. त्यानुरूप २ मे रोजी संथागार सभागृहात आयोजित केले होते.
या (Zilla Parishad) कार्यशाळेत कनिष्ठ लिपीक, वरिष्ठ लिपीक, पर्यवेक्षक, अधिक्षक असे जवळपास ३०० कर्मचारी सहभागी झाले होते. कार्यशाळेत मुकाअ मुरूगंनाथम यांनी मार्गदर्शन केले. तसेच अधिकार्यांनी देखील जि.प.च्या विविध टेबलावरून सुरू असलेल्या योजना व लेखाशिर्षकांची माहिती दिली. प्रशिक्षणानंतर ५० गुणाची परीक्षा घेण्यात आली. घेण्यात आलेल्या प्रश्नसंचात प्रत्येक एक गुणाचे ५० प्रश्न देण्यात आले होते. दरम्यान प्रत्येक कर्मचार्यांनी किमान ३५ गुण घेवून ही परीक्षा पास करावी, अशी अपेक्षाही मुकाअ यांनी व्यक्त केली होती. ऑनलाईन घेण्यात आलेल्या परीक्षा निकाल मुकाअ यांनी अवघ्या १५ मिनिटात जाहिर केला. दरम्यान ४० बाबूंनी ३० पेक्षा कमी गुण प्राप्त केले. त्यामुळे मुकाअ मुरूगांनथम यांनी त्या कर्मचार्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. असे असले तरी सर्व कर्मचार्यांनी आपल्या कार्यसनात निपुण रहावे, अशाही सुचना केल्यात.
परीक्षेच्या दुसर्या दिवशी घेतली कार्यसनाची माहिती
जिल्हा परिषद (Zilla Parishad) तसेच संस्थेतंर्गत येत असलेल्या पंचायत समितीमध्ये कार्यरत कर्मचारी कोणत्या टेबलावर कोणती कामे करतात. याबाबतची माहिती घेणे मुकाअ यांनी सुरू केले आहे. सर्व कर्मचार्यांच्या मोबाईलवर कार्यसनाची माहिती संदर्भातील नोंद करण्यासाठी प्रो-फार्म देण्यात आले आहे. त्या प्रो-फार्ममध्ये कोणत्या कर्मचार्याकडे कोणते काम देण्यात आले, याची माहिती मुकाअ यांनी मागितली आहे. यामुळे कामचुकार कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहेत.
अधिकार्यांपेक्षा कर्मचार्यांवर विश्वास
जिल्हा परिषदेला (Zilla Parishad) आतापर्यत सर्वात कमी वयाचे मुख्यकार्यकारी अधिकारी एम.मुरूगांनथम हे लाभले आहेत. मुकाअ मुरूगांनथम यांच्यासाठी देखील जि.प.त काम करण्याचा पहिलीच वेळ आहे. त्यामुळे मुरूगांनथम हे जि.प.च्या सर्व विभागाचा बारकाईने अभ्यास करीत आहेत. त्यातच विभाग प्रमुखांपेक्षा कर्मचार्यांवर जास्त विश्वास ठेवून संस्थेचे काम आणखी गतिशील करण्यावर भर घालत आहेत.