हिंगोली (ZP Bharti) : जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेत अमरावती येथे परिक्षेसाठी गेलेल्या (Health Nurse) आरोग्य परिचारीका संवर्गातील काही महिलांना (marriage certificate) विवाहाचे प्रमाणपत्र नसल्याच्या कारणातून त्यांना परिक्षा केंद्रात प्रवेश नाकारल्याने अनेकजण परिक्षेपासून वंचित राहिले आहेत.
हिंगोली जिल्हा परिषदेमधील (ZP Bharti) विविध संवर्गातील भरती प्रक्रिया राबविली जात आहे. त्या निमित्ताने जि.प.च्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरीता १३ ते २१ जून या कालावधीत अमरावती व नागपूर येथे ऑनलाईन परीक्षा घेतली जात आहे. हिंगोली येथून अनेक उमेदवार या ऑनलाईन परिक्षेसाठी अमरावती येथे गेले होते. या परिक्षार्थींना प्रारंभी परीक्षा केंद्र पाहण्याकरीता दमछाक करावी लागली. अखेर या केंद्रावर परिक्षार्थी पोहचले. अमरावती येथील एका परीक्षा केंद्रावर आरोग्य परीचारीका पदासाठी परीक्षा देण्यासाठी गेलेल्या जवळपास ४० ते ५० महिला उमेदवारांकडे पॅन कार्ड, आधार कार्ड यावर वडीलाचे नाव असल्याने तसेच त्यांच्याकडे (marriage certificate) विवाहाचे प्रमाणपत्र नसल्याचे कारण दर्शवून त्यांना परिक्षेला बसण्यापासून वंचित ठेवण्यात आले.
यावेळी परिक्षेसाठी आलेल्या महिलांनी परीक्षा केंद्रावर पॅन कार्ड, आधार कार्ड यासह इतर कागदपत्र दाखवूनही त्यांना परिक्षेपासून वंचित ठेवण्यात आल्याने महिलांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला. केवळ (marriage certificate) विवाहाचे प्रमाणपत्र सक्षम अधिकार्यांचे नसल्याचू सांगून परीक्षा देण्यास मनाई करण्यात आल्याचा आरोप रूपाली गावंडे या परिक्षार्थीनी केला आहे. या प्रकरणात न्यायालयात दाद मागितली जाणार असल्याचे सांगून शासनाने (ZP Bharti) हिंगोली जिल्ह्यातील उमेदवारांना हिंगोली जिल्ह्यातच परीक्षा केंद्र द्यावे अशी मागणी देखील परिक्षेपासून वंचित ठेवलेल्या महिलांनी केली आहे.