Gadchiroli Accident :- भरधाव वेगात असलेल्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार तर चार जण जखमी (injured) झाल्याची घटना आज रविवार २९ जून रोजी पोटेगांव मार्गावर सकाळी ९.३० ते १० वाजताच्या सुमारास घडली. राकेश प्रभाकर मुनघाटे( ३०) रा. कुराडी माल ता.गडचिरोली असे मृतकाचे नांव आहे.
दोन्ही दुचाकींची समोरासमोर जबरदस्त धडक
जखमीमध्ये दुर्योधन विलास चौधरी (३०) , छत्रपती विनायक चौधरी(३०)दोन्ही रा. कुराडी तसेच इंदिरानगर गडचिरोली येथील दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार गडचिरोली शहरातील इंदिरा नगरातील दोन अल्पवयीन विद्यार्थीनी टयुशननंतर फोटो काढण्यासाठी पोटेगांव मार्गे दुचाकीने गेले होते. यानंतर त्या गडचिरोलकडे परत येत होत्या. दरम्यान कुराडी येथील दुचाकीचालक हे आपल्या सहकार्यासह येत असतांना दोन्ही दुचाकींची समोरासमोर जबरदस्त धडक बसली. या अपघातात दुसर्या दुचाकीचे चालक राकेश मुनघाटे यांचा मृत्यू (Death) झाला.दोन्ही दुचाकीवरील चार जण जखमी झाले . त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.यापैकी एका मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत.