परभणी/दैठणा (Parbhani) :- कमी किंमतीत सोने (Gold) देतो म्हणून नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील एकास १० लाखाचा चूना लावण्यार्या टोळीचा दैठणा पोलिसांनी पर्दाफाश केला. परभणी तालुक्यातील उमरी शिवारात फिल्मीस्टाईल शोध घेऊन एका महिलेस ताब्यात घेण्यात आला. सदर प्रकरणी दैठणा पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
फिल्मीस्टाईल शोध घेऊन महिलेला केले जेरबंद…!
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, सोमवार १७ मार्च रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास दैठणा पोलिस ठाण्याचे सपोनि. अशोक जायभाय यांना फिर्यादी यांच्या मोबाईलवर फोन आला. दोन अनोळखी महिला व पाच पुरुषांनी माझ्याशी संपर्क केला. ४५००० रुपये किंमतीत सोने देतो म्हणून त्यांनी सांगितले. त्यानुसार फिर्यादी हे १० लाख रुपये घेऊन बाभूळगाव शिवारात आले. त्या अनोळखी इसमांनी फिर्यादी यांच्याकडून दहा लाख रुपयांची बॅग घेऊन पाच मिनिटात सोने आणून देतो असे म्हणून तिथून सर्व निघून गेले, असे सांगितले. सपोनि. अशोक जायभाय व त्यांचे सहकारी पोलिस अंमलदार मुळे, कुकडे, मोरे, अमोल दुबे, होमगार्ड अमोल कच्छवे असे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. फिर्यादी यांच्याकडून घेतलेली माहिती स्थागुशाला दिली. सपोनि मुत्तेपोड, सपोउपनि मधुकर चट्टे, केंद्रे यांचे पथक घटनास्थळी हजर झाले.
परभणीच्या दैठणा व स्थागुशा पोलिसांनी केला पर्दाफाश
सदर बॅग चोरणारे महिला व इतर इसम यांचे वर्णन विचारले. त्यांनी एका महिलेचे वर्णन सांगितल्यावरून सपोनी जायभाय यांना उमरी येथील महिला शिल्पा पवार ही महिलेचा असल्याचा संशय आला. त्यांनी सदर महिलेचा फोटो हस्तगत करून फिर्यादीस दाखवला. तेव्हा सदर महिला तीच असल्याचे फिर्यादीने यांनी सांगितले. दैठणा व स्थागुशा पथकाने तपासाचे चक्रे फिरवीत उमरी, सूरपिंपरी, वडगाव सुक्रे या शेतशिवारात नाकाबंदी करून गावातील नागरिकांकडे चौकशी केली. पोलिसांनी परिसरातील शेतशिवारातील ज्वारी व इतर पिकात सर्च ऑपरेशन राबवून फिल्मीस्टाईल शोध घेऊन सदर महिलेस ताब्यात घेतले. अवघ्या वेळात आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आहे. सदर प्रकरणी दैठणा पोलिस शिल्पाबाई पवार, अशोक पवार, केशव राठोड, एक अनोळखी महिला, तीन अनोळखी पुरुष यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोउपनि ज्योती बळेगावे करत आहेत.