हिंगोली (Hingoli):- जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या संकल्पनेतुन विविध पोलीस ठाणे हद्दीत दाखल झालेल्या गुन्ह्यातील(Crime) जप्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याची विशेष मोहिम(special mission) सुरू असून ३१ ऑगस्टला ११ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल फिर्यादीस सन्मान पुर्वक परत दिला.
जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यात आरोपीकडुन हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याची मोहिम राबविली जाते. त्यानिमित्त जिल्ह्यातील एकूण ७ गुन्ह्यातील सोन्या, चांदीचे दागिने व नगदी असा ४ लाख ३० हजारांचा व ३२ हजाराचे तिन मोबाईल, ६ लाख ७० हजार रुपयाचे १० वाहने व इतर १० हजारांचा मुद्देमाल असा एकूण ११ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल फिर्यादीस परत देण्यात आला. ही कामगीरी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, सर्व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे (local crime) शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, प्रेमदास चव्हाण व सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी, मोहरिल यांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला.