हिंगोली (Isapur Dam) : जिल्ह्यातील इसापुर व सिध्देश्वर धरणात मुबलक पाणीसाठा झाला या धरणात पाण्याची आवक पाहता धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. ३ सप्टेंबर बुधवार रोजी ६ वाजता (Isapur Dam) धरणाचे ७ दरवाजे ०.५० मीटर ने उचलून ११७१९ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग पेनगंगा नदीच्या पात्रात केला जात आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने तसेच (Isapur Dam) धरणाच्या लाभक्षेत्रात सुरू असलेल्या आवक मुळे इसापुर धरण ९७.७२ टक्के तर सिध्देश्वर धरण ९४.९४ टक्के भरले आहे. बुधवारी सायंकाळी ६ वाजता इसापुर धरणाचे ७ दरवाजे ०.५० मीटर ने उचलून ११७१९ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग पेनगंगा नदीच्या पात्रता केला जात आहे. धरणाची पाणी पातळी.४४०.७७ मिटर. उपयुक्त पाणीसाठा ९४३.०६६६ द.ल.घ.मी. टक्केवारी.९७.७२ टक्के मागील सहा तासातील ६ ते ६ पाणी आवक ६.५५४१ द.ल.घ.मी. आहे.