आमगाव (Dr. Babasaheb Ambedkar) : प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती व (Dr. Babasaheb Ambedkar) डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ एप्रिल रोजी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पिंकेश शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमला मुख्य मार्गदर्शक म्हणून मा.वैभव दादा निखाडे युवा व्याख्याते व समाज प्रबोधनकार वर्धा, मा.प्रा. डॉ .सुरेश खोब्रागडे सुप्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत लाखनी, मा.प्रा. डॉ.ममता राऊत फुले -शाहु आंबेडकरी विचारवंत भंडारा हे प्रमुख मार्गदर्शक होते.या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा.राजभुषण मेश्राम अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) स्मारक समिती आमगाव,मा.सुरेश एन.बोरकर अध्यक्ष भा.बौद्ध महासभा आमगाव, मा.विद्याताई साखरे अध्यक्ष भा.बौद्ध महासभा महिला शाखा आमगाव ,मा.सुखचंद वाघमारे गटशिक्षणाधिकारी प. स.आमगाव तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.मुख्य मार्गदर्शकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांसाठी समाजातील विविध घटकांनी एकत्र करून काम करायले पाहिजे. संविधानाने दिलेले मुलभूत अधिकार आणि हक्क अबाधित ठेवण्यासाठी संविधानाचे संरक्षण केले पाहिजे असे मार्गदर्शनातून व्यक्त केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना समितीचे महासचिव इंजि.प्रशांत रावते यांनी मांडली.कार्यक्रमाचे अध्यक्ष पिंकेश शेंडे यांनी (Dr. Babasaheb Ambedkar) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली स्वातंत्र्य ,समता आणि बंधुता या तत्त्वांचा आपल्या जीवनात अंगिकार करावा असे सांगितले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी समितीचे अध्यक्ष पिंकेश शेंडे, उपाध्यक्ष विलास मेश्राम, उपाध्यक्ष ज्योत्स्ना शहारे, समितीचे महासचिव इंजि.प्रशांत रावते, सहसचिव संजय डोंगरे,मेघा टेंभुर्णीकर, महेंद्र मेश्राम (अंतुले), समितीचे कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभाचे महिला -पुरुष सर्व पदाधिकारी तसेच समाजातील सर्व घटकांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मदत केली. (Dr. Babasaheb Ambedkar) कार्यक्रमाचे संपूर्ण सुत्रसंचलन ज्ञानेश्वर साखरे यांनी केले तर आभार प्रदर्शन विलास मेश्राम यांनी केले.




