पांढरकवडा (Yawatmal) :- शहरातील एका १४ वर्षाच्या मुलीसोबत गेल्या दोन वर्षापासुन सतत शारिरीक संबध प्रस्तापित केल्याने पिडीत मुलगी पाच महिण्याची गर्भवती (pregnant) राहिली आहे. याबाबत पिडीतेने १६ जुन रोजी पांढरकवडा पोलीसात आरोपी विरुध्द तक्रार दाखल केल्याने पोलीसांनी आरोपी विरुध्द बलात्कार (rape), पोक्सो (POCSO) व अॅट्रोसिटी अॅक्टनुसार (Atrocity Act) गुन्हे दाखल केले आहे. शंतणु सचिन जगताप २२ रा आखाडा वार्ड असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पिडीत झाली पाच महिण्याची गर्भवती, आरोपी विरुध्द गुन्हे दाखल
पिडीतेची आरोपी सोबत २०२३ मध्ये ओळख झाली होती. पिडीत आरोपीच्या घरी जात होती. आरोपीने तिला मी तुझ्यावर प्रेम करीत असल्याचे सांगुन तिचा विश्वास संपादन केला. आरोपी १५ सप्टेंबर २०२३ पासुन तर १५ मे २०२५ पर्यत सतत पिडीतेसोबत शारिरीक संबध (physical relations) प्रस्तापित करीत आला आहे. त्यामुळे पिडीत हि गर्भवती राहिली आहे. पिडीत हि सद्या १४ वर्षाची असुन ती पाच महिण्याची गर्भवती राहिली आहे. हि बाब तिच्या लक्षात येताच तिने आपल्या आईला सोबत आणुन आरोपी विरुध्द तक्रार नोंदविली. पोलीसांनी पिडीतेच्या तक्रारी वरुन आरोपी शंतनु सचिन जगताप विरुध्द ६४ (२)(एम),६४(२)(आय),६५(१) बिएनएस, तथा ४,६पोक्सो व ३(२)(व्ही) अॅट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हे दाखल केले आहे. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजने करीत आहे.