कळमनुरी (Ahilya Devi Holkar) : सतीची प्रथा झुगारून मुघलशाही आणि ब्रिटिशांविरुद्ध लढाई करून तलवारीच्या बळावर २९ वर्षे राज्य करणाऱ्या जगप्रसिद्ध महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilya Devi Holkar) यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त कळमनुरी शहरात आज दिनांक 31 मे 2025 रोजी अहिल्या प्रेमी कडून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
महाविकास आघाडी कडून (Ahilya Devi Holkar) पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष दिलीपराव चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी मार्केट कमिटीचे सभापती मारोतराव खांडेकर, माजी जि.प.सदस्य राजेंद्र शिखरे, माजी नगराध्यक्ष सुवर्णा गाभणे, ॲड.रवि शिंदे, डॉ .संतोष बोंढारे, उध्दव निळकंठे, माजी नगरसेवक बाबा पठाण, प्रा.गुलाब भोयर,मोईन रिझवी,अभिजीत देशमुख, सुशिल बोंढारे,अनिल खांडेकर ,प्रदीप मस्के, शंकर मुलगीर,गणेश मुलगीर, अतुल वाघमारे, प्रभू वडकुते, किसन वाघमारे, प्रदीप वैद्य, सुदर्शन वायकुळे, रामप्रभू वायकुळे, भास्कर ढाले, सुनील पाईकराव यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि अहिल्या प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.