Parbhani suicide case :- परभणीतील गंगाखेड येथील पत्नीचा मृत्यू (Death) झाल्यावर लेकरांचे कसे होईल या विवंचनेत असलेल्या ३५ वर्षीय तरुणाने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. ही घटना १३ जुलै रोजी दुपारी १ च्या सुमारास गंगाखेड तालुक्यातील इसाद तांडा येथे घडली. सदर प्रकरणी आकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गंगाखेड तालुक्यातील इसाद तांडा येथील घटना आकस्माक मृत्यूची नोंद
बाळू नागनाथ राठोड यांनी खबर दिली आहे. लहु नागनाथ राठोड (वय ३५ वर्ष) असे मयताचे नाव आहे. खबर देणार्यांचा भाऊ लहु राठोड हा पत्नीचा मृत्यू झाल्यापासून चिंतेत होता. लेकराचे कसे होईल, त्यांचा सांभाळ कोण करणार, या ताणतणावात मद्यपी अवस्थेमध्ये राहत्या घरातील पत्र्याखालील आडव्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रकरणाचा तपास पो.ह. शिंदे करत आहेत.