तालुका काँग्रेस कमिटीचा चक्काजाम आंदोलनाचा ईशारा
तिवसा (Orange farmers) : तिवसा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या दोन महिन्यापासून सततच्या पावसाने तथा वादळी वाऱ्याने संत्रा ऐन काढणीच्या अवस्थेत असताना सरासरीपेक्षा तालुक्यात जास्त पाऊस झाल्यामुळे, मोठ्या प्रमाणात संत्रा फळ गळून पडत आहे. महायुती सरकारने कपाशी तूर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमालाला समाधानकारक भाव दिला नसल्यामुळे यापूर्वी शेतकरी आधीच हवालदिल आहे. (Orange farmers) संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन शुल्क खर्च, खते बी बियाणे कीटकनाशके त्यावर असलेली जीएसटी यात असल्याचे कंबरडे मोडले आहे.
तिवसा तहसील येथे जोरदार ठिय्या आंदोलन
जिल्ह्यातील मोर्शी वरूड,वर्धा जिल्ह्यातील आष्टी आर्वी या भागात महसूल विभाग व कृषी विभागामार्फत सर्वेक्षण करेल याची माहिती सुद्धा उपलब्ध आहे. परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांच्या (Orange farmers) संत्रा फळगळ बाबतच्या संकटाचा सर्वेक्षण, त्यावर आलेल्या रोगाबाबत मार्गदर्शन करण्यास कृषी विभाग असमर्थ दिसतोय. सरकारच्या कृषी व फलोत्पादन मंत्रालया विभागामार्फत महायुती सरकारमधील मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या या संकटाकडे तातडीने लक्ष देऊन तातडीने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेला नुकसानीचे सर्वेक्षण करून पंचनामे कडून रुपये तीन लक्ष हेक्टरी मदत प्रदान करण्याची मागणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना तहसीलदार तिवसा मार्फत निवेदनातून करण्यात आली.

तालुक्यातील (Orange farmers) संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण न झाल्यास त्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास सात दिवसांनी राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
तहसीलदारांना फळगड झालेली संत्री दिली भेट
यावेळी (Tivsa taluka) तालुका काँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष वैभव वानखडे, माजीजि प सभापती दिलीपराव काळबांडे, खरेदी-विक्रीचे अध्यक्ष सुरेशराव मेटकर, नगगराध्यक्ष योगेशभाऊ वानखडे, खरेदी विक्री संचालक गजानन अळसपुरे, माजी बाजार समिती संचालक दिनेश साव, शहर काँग्रेस अध्यक्ष सेतू देशमुख, कार्यकारी शहराध्यक्ष सुनील बाखडे, गटनेते किसन मुंदाने, युवक काँग्रेसचे महासचिव रितेश पांडव, माजी नगरसेवक नरेंद्र विघ्ने, मोहनराव वानखडे, प्रमोदराव वानखडे, अतुलभाऊ देशमुख, पं स सदस्य शरद वानखडे, खरेदी विक्री संचालक दिलिप वानखडे, दिनेशभाऊ वानखडे, धीरज ठाकरे, दिवाकर भुरभुरे, अतुल कळंबे, कमलाकर जगताप, शरद वानखडे, अशोकराव बडकस, हरिदास भगत, भारतराव ढोणे, रामदास पाटील, शंकरराव टरके, राजकुमार ढोणे, केशव चौधरी, गजानन भोंबे, नितीन डोंगरे, शब्बीर शहा, गौरव चौधरी, दीपक चौधरी, केशव चौधरी, सचिन वानखडे,अंकुश देशमुख, स्वप्निल गंधे, नितीन कळंबे, सुधीर ढोके, मंगेश राऊत, श्रीधर देशमुख, चंद्रशेखर कडू, अतुल खुळे, करण उईके, पांडुरंग खेडकर, अनिकेत प्रधान, हर्षल कडू, नंदकिशोर पोलगावंडे, अमोल पन्नासे, अजय बाखडे, अभिजीत चौधरी, आशिष ताथोडे, आकाश मकेश्वर, तुषार लेवटे, ओम वानखडे, सागर वाघमारे, राज बावणे, गौरव देशमुख, बबलू उईके,राज निकाळजे, व शेकडो संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.




