गडचिरोली -नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगलातील घटना
गडचिरोली (Gadchiroli Naxals) : गडचिरोली पोलीस दल व नक्षल्यामध्ये तब्बल ८ तास चाललेल्या चकमकीमध्ये ४ जहाल नक्षल्यांचा खात्मा करण्यास गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले आहे.ही घटना आज २८ ऑगस्ट रोजी गडचिरोली -नारायणूर सीमेवरील कोपर्शी जंगल परीसरात घडली.
दिनांक २५ ऑगस्ट रोजी (Gadchiroli Naxals) गडचिरोली–नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात गडचिरोली विभागाचे गट्टा दलम, कंपनी क्रमांक १० व इतर नक्षली दबा धरून बसले असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर नक्षल विरोधी अभियानाचे अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली सी -६० ची १९ पथके आणि सीआरपीएफ क्वाटची ०२ पथके जंगल परिसरात रवाना करण्यात आली होती.
त्या भागात सुरू असणार्या प्रचंड पावसादरम्यान दोन दिवसानंतर पोलीस पथके आज २८ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास सदर जंगल परिसरात पोहोचून शोध मोहीम राबवत असताना (Gadchiroli Naxals) नक्षल्यांनी पोलीस पथकांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला, ज्याला पोलीस पथकाने प्रभावी प्रत्युत्तर दिले.
सुमारे आठ तास चाललेल्या चकमकीनंतर सदर परिसरात शोध घेतला असता ३ महिला व १पुरूष अशा ०४ जहाल नक्षल्यांचे मृतदेह मिळून आले आहेत. याशिवाय घटनास्थळावरून ०१ एसएलआर रायफल, ०२ इंसास रायफल व ३०३ क्रमांकाची १ रायफल जप्त करण्यात आली अ ाहे. सदर भागात उर्वरित (Gadchiroli Naxals) नक्षल्यांचा शोध घेण्यासाठी नक्षलविरोधी अभियान सुरू आहे.




