चंद्रपूर (HTBT Seeds) : पोलीस स्टेशन राजुरा हद्दीत वसंत शंकर पुणेकर रा. भुरकुंडा याचे राहते घराची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांचे घरात ४० किलो बीटी बियाणे (एचटीबीटी) किंमत ७६ हजार ८०० रुपयाचा माल अवैध रित्या आढळून आला. याबाबत त्याला विचारपूस केली असता सदर माल गटन्ना राजन्ना पाकावार रा. सुकडपल्ली ता. राजुरा याचे असल्याचे सांगितले.
दोन्ही आरोपींना ताब्यात घेवुन सदर बियाणांची पडताळणी व कारवाई करण्यासाठी कृषी विभागाला माहिती देण्यात आली असता कृषी विभागाचे अहवालावरुन प्रतिबंधित कापूस (एचटीबीटी) बियाणे (HTBT Seeds) साठवणूक, जवळ बाळगणे तसेच विक्रीच्या उद्देशाने शेतकर्यांची फसवणूक करण्याकरीता आरोपींनी हे बियाणे बाळग्त असल्याचा अहवाल कृषी अधिकारी नरेश रामकृष्ण ताजने यांनी दिल्यानेत दोन्ही आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन राजुरा येथे विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर तपास पोलीस निरीक्षक सुमित परतेकी, यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हाके, भिष्मराज सोरते, पोहवा विक्की निर्वाण, अविनाश बांबोळे, महेश बोलगोडवार, शफीक शेख, शरद राठोड, आनंद मोरे व कृषी अधिकारी नरेंद ताजने, पंचायत समिती राजुरा यांनी केली आहे.