पांढरकवडा (Cyber Crime Case) : एका प्राध्यापकास व्हॉटअॅपवर एपीके फाईल पाठवुन त्यांचा मोबाईल हॅक करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या बँक अकाउंटला तिन अकाउंट अॅड करुन त्यातील एका अकाउंटमध्ये ५ लाख ३१ हजार रुपये वळते करुन त्या प्राध्यापकाची (Cyber Crime Case) आर्थीक फसवणुक करण्यात आल्याची घटना १९ एप्रिल रोजी शहरात उघडकीस आली आहे.
चेतन विश्वनाथ कनाके रा. पटेल ले आउट असे फसवणुक झालेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. चेतन कनाके हे झरीजामणी येथील शिबला पोस्ट बेसीक आश्रशाळेत प्राध्यापक पदावर कार्यरत आहे. त्यांनी घर बांधण्याकरीता १० लाखाच्या होम लोनची केस पांढरकवडा येथील महाराष्ट्र बँकेतुन केली होती. त्यांचे लोन मंजुर झाले असुन त्यांच्या खात्यात १० लाखाचे लोन जमा करण्यात आले होते. गुरुवारी १७ एप्रिल रोजी चेतन यांच्या व्हॉटअॅप् नंबरवर एपीके फाईल आली होती. त्यांनी ती फाईल ओपन केली. त्या फाईलच्या प्रोसेसमध्ये त्यांना मोबाईल नंबर मागण्यात आला होता.
त्यांनी मोबाईल नंबर टाकला असता त्यांना संशय आल्याने त्यांनी ती फाईल अनिस्टॉल करुन तो नंबर सुध्दा ब्लॉकमध्ये टाकला होता. शनिवार १९ रोजी दुपार दरम्यान चेतन यांनी पांढरकवडा महाराष्ट्र बँकेत जावुन ५ लाखाचा विड्रॉल टाकला होता. याच वेळी त्यांचा मोबाईल हॅक करुन हॅकरने त्यांच्या खात्याला तिन अकाउंट अॅड केले. व त्यातील एका अकाउंटमध्ये एकदा ४ लाख तर दुसर्यांचा (Cyber Crime Case) १ लाख ३१ हजार रुपये खात्यात वळते करुन घेतले. कनाके हे बँकेत असतांनाच हा सर्व प्रकार झाल्याने त्यांनी बॅकेच्या अधिकार्यांना ही बाब सांगितली.
तेव्हा त्यांचा मोबाईल हॅक करुन त्यात तिन अकाउंट नव्याने अॅड करुन हॅकरने रक्कम वळती केल्याचे त्यांना सांगण्यात आले. कनाके यांनी लगेचच सायबर हेल्पलाईनच्या १९३० या क्रमांकावर कॉल करुन माहिती दिली. यवतमाळ पोलीस दलाच्या सायबर सेलच्या अधिकार्यांनी तात्काळ त्या हॅक केलेल्या अकाउंटची माहिती काढली. ती रक्कम वळती करण्यात आलेला अकाउंट नंबर आसाम राज्यातील असुन त्या (Cyber Crime Case) अकाउंट मधुन ईतर आठ अकाउंटमध्ये ती ५ लाख ३१ हजाराची रक्कम वळती करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी कनाके यांना दिली आहे. याबाबत अधिक तपास सायबर सेलचे अधिकारी करीत आहे.




