८ प्रभाग १५ मध्ये वाकोडकर मित्रमंडळाचा स्तुत्य उपक्रम
परभणी (Parbhani Panpoi) : उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांना पाणी पिण्यासाठी पानपोई व मुक्या जनावरांसाठी पाणवठे ठेवण्याचा उपक्रम परभणी शहरातील प्रभाग १५ मध्ये वाकोडकर मित्र मंडळाने राबविला आहे. या (Parbhani Panpoi) उपक्रमात एक पानपोई व ५५ ठिकाणी पानवठे ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांची व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वाकोडकर मित्र मंडळातर्फे तलाठी भवन, वसमत रोड येथे (Parbhani Panpoi) पाणपोईची सोय करण्यात आली आहे. तसेच मुक्या जनावरांसाठी प्रभाग क्र. १५ मध्ये ५५ ठिकाणी पाणवठे ठेवण्यात आले आहेत. अशी माहिती अभिषेक वाकोडकर यांनी दिली. हा उपक्रम प्रभाग १५ मध्ये राबवीत असताना पिण्याच्या पाण्याची सोय वसमत रोडवरील तलाठी भवन जवळ करण्यात आली.
या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे वाहतूक होताना नागरिक पानपोईवर येऊन आपली तहान भागवतांना दिसत आहेत. तर जनावरांची ५५ पाणवठे ही प्रभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे. त्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मुक्या जनावरांच्या (Parbhani Panpoi) पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. वाकोडकर मित्रमंडळाच्या या उपक्रमात अजिंक्य मुदगलकर,मधुसूदन वाकोडकर, अमोल वाकळे, सुमेध घनसावंत, रोहीत उक्कडगावकर, चैतन्य कोठेकर, स्वप्निल जोशी, आकाश जल्हारे, मुरली शिंदे, अमोल धुगने हे सर्व करून परिश्रम घेत आहेत.