हिंगोली (Dog Bitten Case) : शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर मोकाट कुत्र्याचा वावर वाढला आहे. शहरातील जवाहर रोडवर असलेल्या सरस्वती विद्या मंदिर परिसरात मोकाट कुत्र्याने रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरीकावर हल्ला करून पाच ते सहा व्यक्तींना चावा घेवून जखमी केले आहे. या जखमींना दवाखान्यात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले. हिंगोली शहरात (Dog Bitten Case) मोकाट कुत्रे मोठ्या प्रमाणावर असून सैरावैरा धावताना दिसत आहेत.
याकडे संबंधीत विभागाचे दुर्लक्ष होत असून ३० जुलै रोजी सकाळी शहरातील जवाहर रोडवर असलेल्या सरस्वती विद्या मंदिर परिसरात मोकाट कुत्र्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या काही नागरीकावर व तेथे बसलेल्या काही व्यापाऱ्यावर हल्ला करून पाच ते सहा व्यक्तींना या (Dog Bitten Case) मोकाट कुत्र्याने चावा घेवून जखमी केले व त्याला जीवाने मारले आहे. त्यामुळे परिसरातील नागरीकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.