आता अवैध व्यवसाय विरोधी अभियान-२ सुरू
हिंगोली (Illegal Business Raid) : जिल्ह्यात अवैध व्यवसाय विरोधी अभियान -२ मध्ये पोलीसांनी अनेक ठिकाणी (Illegal Business Raid) अवैध धंदावर छापे मारले. ज्यामध्ये ४०३ ठिकाणी केलेल्या कारवाईत ७ कोटी ३३ लाख ३ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नांदेड परिक्षेत्रात १ ते ३१ मे या कालावधीत विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अवैध व्यवसाय विरोधी अभियान १ राबविण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गुटखा, दारू बंदी, मटका जुगार यासह अनेक ठिकाणी अवैध धंदावर छापे मारले. ज्यामध्ये १० ठिकाणी पोलीसांनी गुटख्यावर छापे मारले असता १२ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. २३६ ठिकाणी दारू बंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून १० लाख २७ हजार ५५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ९२ ठिकाणी अवैध रित्या सुरू असलेल्या मटका जुगारावर छापे मारून १ लाख ८९ हजार ४६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ७२ ठिकाणी केलेल्या इतर (Illegal Business Raid) कारवाईत ६१ लाख १७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकूण केलेल्या कारवाईत ४०३ ठिकाणी मारलेल्या छाप्यात ७ कोटी ३३ लाख ३ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
१ मे महाराष्ट्र दिनापासुन परिक्षेत्रातील चार ही जिल्ह्यात अवैध व्यवसाय विरोधी अभियान यशस्वी रित्या रारबविण्यात आले असल्याने आता विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी जून महिन्यात ही अवैध व्यवसाय विरोधी अभियान – २ हे राबविण्याच्या सुचना दिल्या आहेत. या मोहिमे दरम्यान अवैध धंदे चालविणार्या व्यक्तीवर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याने १ ते ३१ मे दरम्यानच्या कालावधीत जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली छापे मारून गुन्हे दाखल केले.