परभणी (Parbhani liquor Case) : जिंतूर तालुक्यातील बोरी गावात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घालत देशी दारूचे दुकान फोडून तब्बल ७० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडली. या (Parbhani liquor Case) प्रकरणी भास्कर प्रभू राठोड यांच्या फिर्यादीवरून बोरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर व्यापारी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी देशी दारू दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर दोन दिवसांचा जमा गल्ला असलेली सुमारे ७० हजार रुपयांची रोकड त्यांनी लंपास केली. सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर तातडीने पोलिसांत धाव घेण्यात आली.
दरम्यान, बोरी गावात अवघ्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २१ ऑगस्ट रोजी एका घरफोडीची घटना घडली होती. त्यात अंदाजे तीन ते चार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला होता. सलग दोन दिवसांत झालेल्या या (Parbhani liquor Case) चोरीच्या घटनांमुळे गावात भीतीचे सावट पसरले आहे. व्यापारी व ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाने गस्त वाढवावी, अन्यथा चोरट्यांचा आत्मविश्वास अधिक वाढेल, अशी मागणी केली आहे.
या (Parbhani liquor Case) चोरीच्या घटनांमुळे गावात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार हे करीत आहे.