यवतमाळ (Gaming App Fraud) : गेमींग अॅपच्या माध्यमातून ८ कोटी ६३ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. ही घटना यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करळगावात उघडकीस आली. या (Gaming App Fraud) प्रकरणात पोलिसांनी सहा आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.
टीकाराम उकंदराव राठोड वय ५५ रा बाणगाव असे फिर्यादीचे नाव आहे.गुन्हे दाखल करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कानाराम भगतराम जाट (खुडखुडीया) वय २६ रा. धनारी खुर्द जोधपुर राजस्थान, रविंद्र पुनीया वय २५ वर्ष रा. बर्नीया जोधपुर राजस्थान, करमवीर सींग वय २५ वर्ष रा. राजस्थान, श्रावण व अन्य दोघांचा समावेश आहे. आरोपींनी राठोड यांना गावरान धाबा करळगाव येथे येवुन चर्चेदरम्यान ट्रंडींग कंपनीत काम करीत असल्याचे सांगुन बेंबळा व्हेली शेतकरी उत्पादक कंपनीशी करार करतो.
तसेच कंपनी वेगवेगळ्या सुवीधा पुरवुन व्यवहाराकरीता ५० लाख रुपये देईल असे सांगुन फिर्यादीकडुन व इतरांकडुन बँकखातेचे कागदपत्रे, आधारकार्ड, पॅनकार्ड, सिमकार्ड तसेच इंटनेट बँकिंगची सेवा सुरु करुन देवुन तीन महीन्यानंतर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होईल असे सांगुन फिर्यादीसह इतर लोकांच्या एकुण ८ करोड ६३ लाख खात्यामधुन वेगवेगळ्या गेमींग? पवरुन रक्कम परस्पर वळती करुन फसवणुक केली.
तसेच आरोपीनी तहसील कार्यालय दारव्हा येथुन जन्माचा दाखला मिळविण्याकरीता शाळा सोडल्याचा बनावट दाखला सादर करुन कार्यालयाची फसवणुक केली. हा (Gaming App Fraud) प्रकार लक्षात येताच या प्रकरणात यवतमाळ ग्रामीण पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली.त्यावरून पोलिसांनी सहा आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.