परभणी स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई चोरीच्या दुचाकी जप्त
परभणी (Parbhani Crime Case) : नांदेड जिल्ह्यात दुचाकी चोरणार्या चोरट्याला परभणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने रेल्वे स्थानक परिसरातुन ताब्यात घेतले. दोन आरोपींना चोरीच्या दुचाकीसह पकडण्यात आले आहे.
स्थागुशाच्या पथकाला गोपणीय माहिती मिळाली होती. ज्ञानेश्वर बालाजी माहोलकर हा इसम त्याच्या एका साथीदारासह नांदेड जिल्ह्यात दुचाकी चोरी करुन परभणी रेल्वे स्थानक परिसरात फिरत असल्याचे समजले. यावरुन पोलिसांनी ज्ञानेश्वर माहोलकर याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय वजीराबाद नांदेड येथून (Parbhani Crime Case) दुचाकी चोरी केल्याचे सांगितले.
तसेच आणखी एक दुचाकी जयधन हॉटेल नांदेड येथून चोरी केल्याची कबुली दिली. चोर्यांमध्ये प्रशांत उर्फ परशुराम सुरेश शिंदे याचा देखील सहभाग असल्याचे उघड झाले. पथकाने त्यालाही ताब्यात घेतले. संबंधीताजवळून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई पो.नि. विवेकानंद पाटील, सपोनि. श्रीधर जगताप, पोलिस अंमलदार मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, केशव लटपटे, रवि जाधव, रंजीत आगळे, सुर्यकांत फड, पांडूरंग तुपसुंदर, मुकेश बुधवंत, माणिक डुकरे, निलेश परसोडे, दिपक मुदिराज, शेख उमर, उत्तम हनवते, गणेश कौटकर यांच्या पथकाने केली.
गांधी पार्क परिसरातुन दुचाकी चोरटा ताब्यात…
परभणी : नानलपेठ पोलिस ठाणे हद्दीतुन चोरीला गेलेली दुचाकी घेऊन एक संशयीत गांधी पार्क परिसरात उभा असल्याची माहिती स्थागुशाला मिळाली. यावरुन कारवाई करत सोमवार १३ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी मोहन शामराव नवघरे याला ताब्यात घेतले. त्याच्या जवळून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.