उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाची वाळू माफियांविरुद्ध कारवाई
हिंगणघाट (Sand Tractor seiz) : वाळू, ट्रॅक्टरसह आठ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाने केली. हिंगणघाट येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाला अजय लोभेश्वर दाते रा. निशानपुरा वॉर्ड, हिंगणघाट हा मालक राजू उपाध्ये रा. तेलीपुरा वॉर्ड याच्या सांगण्यावरून वणा नदीच्या पात्राचे बोरखेडी घाट येथून वाळू चोरून हिंगणघाट शहराकडे वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यावरून ट्रॅक्टर थांबवून तपासणी केली असता बिना रॉयल्टी वाहतूक करताना रंगेहाथ मिळून आला. पंचनामा कारवाई करून ट्रॅक्टर, ट्रॉली, १ ब्रास वाळू असा ८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या (Sand Tractor seiz) प्रकरणी आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयातील पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे, पोलीस नाईक रवींद्र घाटुर्ले, पोलीस शिपाई राकेश इतवारे यांनी केली.
वाळू तस्करी करणारे ३ ट्रॅक्टर पकडले; तहसीलदार योगेश शिंदे यांची कारवाई
हिंगणघाट () : वाळू तस्करी करणारे तीन ट्रॅक्टर पकडण्यात आले. तहसीलदार योगेश शिंदे आणि पथकाने ही कारवाई केली. कुरण रिठ शिवारातील वाळू घाटामध्ये ३ मे रोजी पहाटेच्या सुमारास तहसीलदार योगेश शिंदे व त्यांच्या पथकाने छापा टाकून अवैधपणे वाळू उत्खनन व वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर जप्त केले. जप्त केलेले तिनही ट्रॅक्टर पोलीस स्टेशन वडनेर येथे जमा करण्यात आले. (Sand Tractor seiz) सदर तिन्ही टॅक्टरवर प्रत्येकी १२३३०० असा ३६९९०० रुपये दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार योगेश शिंदे यांनी दिली. ही कारवाई जिल्हाधिकारी वन्मथी सी, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार योगेश शिंदे, नायब तहसीलदार सागर कांबळे, तलाठी बीमरूट यांच्यासह पथकाने केली.