Nanded :- महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातून ८०० जेष्ठ नागरिक आज आयोध्या धाम (Ayodhya Dham) येथे तीर्थ दर्शनासाठी रवाना झाले आहेत.समाज कल्याण विभागाच्या वतीने रेल्वे स्थानकावर जय्यत तयारी करण्यात आलीय. यात्रेकरूना पुष्पहार घालून त्यांचे रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यात आलायं, विशेष रेल्वेने हे यात्रेकरू आज नांदेड रेल्वे स्थानकावरून (Nanded Railway Station) आयोध्या धाम येथील प्रभू रामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी निघाले आहेत.
८०० जेष्ठ नागरिक आज आयोध्या धाम येथे तीर्थ दर्शनासाठी रवाना
प्रवासात वयोवृध्द नागरिकांना कसल्याही प्रकारची अडचण येवू नये,यासाठी प्रशासनाच्यावतीने विशेष काळजी घेण्यात आलीय,समाज कल्याण विभागाचे १५ कर्मचारी व ४ डाॅक्टराची टिम या यात्रेकरू सोबत पाठविण्यात आलीय. गाव खेड्यातील सर्व सामान्य,गोरगरीब ज्येष्ठ नागरिकांना प्रभू रामचंद्राचे दर्शन घडत आहे.याचा मला मनापासून आनंद होत आहे अशी प्रतिक्रीया आमदार हेमंत पाटील यांनी दिलीय. यावेळी खासदार डाॅ.अजित गोपछडे, आ.बाबूराव कोहळीकर, आ.डाॅ.तुषार राठोड, आ.आनंदराव बोंडरकर, डाॅ.संतुकराव हंबर्डे,समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.