गतवर्षीच्या तुलनेत धरणातील पाणी पातळी ३२ टक्क्यांनी वाढली
सौरभ साकळे
कळमनुरी (Isapur Dam) : ईसापुर धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ होत असुन धरण भरण्यासाठी आता केवळ १६टक्के पाण्याची आवश्यकता आहे.दि.७ ऑगस्ट रोजी ईसापुर धरणाची पाणी पातळी ही ८४ टक्क्यावर पोहोचली आहे.
मराठवाडा विदर्भाच्या सीमेवर असलेल्या ईसापुर धरण (Isapur Dam) असुन या धरणाची क्षमता १२७९.०६३१ दलघमी इतकी असुन सध्या स्थितीत ८१०.५६०२ दलघमी पाणी साठा लग्नामध्ये उपलब्ध असून धरणाच्या पाणी पातळी मध्ये लक्षणीय वाढ झाली असून सध्या धरणाची पाणी पातळी ४३९.३३ मीटर झाली असल्याने ईसापुर धरण हे ८४.०७ टक्के भरले आहे.
ईसापुर धरणात (Isapur Dam) मागील २४तासात २.९५७० दलघमी इतकी आवक झाली असून गतवर्षीच्या तुलनेमध्ये ३२टक्के पाणी यावर्षी जास्त आले आहे सध्या परिस्थितीत ईसापुर धरणाचे पुर्ण सांडवा गेट बंद असल्याची माहिती उर्ध्व पेनगंगा प्रकल्प उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांनी दिली आहे. ईसापुर धरण (Isapur Dam) क्षेत्रात याच पद्धतीने पाण्याची आवक झाली किंवा धरण क्षेत्रात दोन-तीन पाऊस मोठे झाल्यास धरणाची वक्रद्वारे उघडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.