जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे व अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मारले छापे
३४ लाख २६ हजार ५९० रुपयाचा मुद्देमाल जप्त
३४ लाख २६ हजार ५९० रुपयाचा मुद्देमाल जप्त
हिंगोली (Anti-Illicit Mission) : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यावर छापे मारण्याबाबत नांदेड परीक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यावर अवैध व्यवसाय विरोधी अभियान १ (Anti-Illicit Mission) अंतर्गत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मारलेल्या छाप्यात १०२ ठिकाणी अवैध धंद्यावर कारवाई करून १०२ आरोपीवर गुन्हे दाखल केले. ज्यामध्ये ३४ लाख २८ हजार ५१० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अवैध व्यवसाय विरोधी अभियान १ (Anti-Illicit Mission) मध्ये हिंगोली जिल्ह्यात जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मटका, जुगार, गांज्या, अवैध दारू, वाळू आदी अवैध व्यवसायांवर छापे मारण्यात आले. जिल्ह्यात १०२ ठिकाणी केलेल्या कारवाईत १०२ आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले. ज्यामध्ये ३४ लाख २६ हजार ५९० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही मोहीम सुरूच असल्याने अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
तडीपार, एमपीडीए व मोक्का अंर्तगतही कारवाई केली जाणार-शहाजी उमाप
अवैध व्यवसाय विरोधी अभिधान (Anti-Illicit Mission) या मोहीमे दरम्यान सातत्याने अवैध व्यवसायीका विरुद्ध तड़ीपार इमपीडीए व प्रकरण परत्वे मोक्का कायद्यांतर्गत देखील कारवाई करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या असून, सद्या अशा व्यक्ती विरुद्धचे गुन्हे अभिलेख पडताळणीचे काम सुरु आहे. आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाच्या nandedrange, mahapolice.gov.in या वेबसाईटवर कळवून अशा अवैध व्यवसायाचा बिमोड करण्यासाठी आपला हातभार लावा असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.
अवैध धंदे चालता कामा नये: पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे
हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी अवैध धंदे सुरु असल्याने स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाद्वारे त्यावर कारवाई केली जात आहे. जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे चालता कामा नये, या संदर्भात जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत वेळोवेळी सुचना दिल्या जातात, तरी देखील काही पोलिस ठाणे हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याचे छाप्यावरून झाले आहे. जिल्ह्यात (Anti-Illicit Mission) अवैध व्यवसाय विरोधी अभियान १ अंतर्गत अवैध धंद्यावर परिणामकारक छापे मारले जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत, असा गर्भित इशारा जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला आहे.
१ ते २१ मे दरम्यान नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरोधी अभियान १ चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र दिनापासुन हे (Anti-Illicit Mission) अभियान सुरु करण्यात आले असताना १ ते ७ मे दरम्यानच्या कालावधीत हिंगोली जिल्ह्यात १०२ ठिकाणी अवैध धंद्यावर छापे मारण्यात आले. ज्यामध्ये १०२ आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले असुन २४ लाख २६ हजार ५१० रुपयाचा मुद्देमाल अप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे नांदेड परिक्षेत्रात नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. ज्यामध्ये (Anti-Illicit Mission) अवैध धंद्यावर केलेल्या कारवाईत परभणी जिल्हा अव्वल असुन दुसऱ्या क्रमांकावर हिंगोली जिल्हा आहे.