Hingoli :- नगरपरिषद कळमनुरीच्या अंतर्गत नांदेड हिंगोली या मुख्य रस्त्याचे चौपदरीकरण ची कामे शहरात सुरू आहेत याकरता रस्त्यालगतची मोठाली झाडे तोडून टाकण्यात येत आहेत यातच 200 पेक्षा जास्त वर्षे वयाची वडाची झाडे(Banyan trees) पण तोडल्या जात आहेत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, जेष्ठ पत्रकार नंदकिशोर तोष्णीवाल यांच्या संकल्पनेतून सदरची झाडे मुळातून काढून नगरपरिषद कळमनुरीच्या हिंदू स्मशानभूमीत स्थलांतरित करण्याचे ठरल्यानुसार आज रोजी पर्यंत सहा झाडे स्थलांतरित करून पुर्नरोपीत करण्यात आली आहेत.
200 पेक्षा जास्त वर्षे वयाची वडाची झाडे
नगर परिषदेचे प्रशासकीय अध्यक्ष तथा तहसीलदार जीवककुमार कांबळे, मुख्याधिकारी रवीराज दरक, नगर अभियंता निकेत यरमळ ,ज्येष्ठ लिपिक आनंद दायमा, करण चापके व वनखात्याचे सेवानिवृत्त अधिकारी वाजेद भाई यांच्या सहकार्याने व परिश्रमाने सहा झाडांचे स्थलांतर करण्यात आले असून सदरची झाडे पुर्नरोपीत करण्यात आली आहेत या झाडांना नियमितपणे पाणी घालून त्यांना जगविण्याचा मानस नंदकिशोर तोष्णीवाल यांनी व्यक्त केला आहे. 200 वर्ष जुनी झाडे स्थलांतरित करण्याचा हा प्रयोग प्रथमताच शहरात करण्यात आला आहे. या झाडांच्या वाढीकडे शहरवासीय उत्सुकतेने लक्ष देऊन आहेत.