देसाईगंज (Tractor Accident) : टॅ्रक्टर अपघातात एका पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना आज ५ जून रोजी दुपारच्या सुमारास घडली. लकी रवी बनपूरकर (५) रा. कोरेगाव चोप असे मृतक बालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार लकी हा घरा शेजारील शिवमंदीरात खेळत होता. गोवींदा ठाकरे हा स्वतः चा (Tractor Accident) टॅ्रक्टर घेऊन शेती कामासाङ्गी जात होता. खेळाच्या भरात त्यांचे टॅ्रक्टरकडे लक्ष नव्हते. लकी हा टॅ्रक्टर ट्रॉली व मंदिराच्या खांबात सापडल्याने त्याच्या डोक्याला गंभिर दुखापत झाली व त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहीती देसाईगंज पोलीसांना देण्यात आली. मृतदेह देसाईगंज ग्रामिण रुग्णालयात शवविच्छदनासाङ्गी पाङ्गवण्यात आले. सायंकाळच्या सुमारास लकीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. लकी या पाच वर्षीय बालकाच्या मृत्युमुळे( Tractor Accident) सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. देसाईगंज पोलीस अधीक तपास करीत आहेत.




