बाभुळगाव (Mahavitaran office) : आधीच शेतकरी अती पावसामुळे हतबल झाला असताना. त्याच्या शेतातील कपाशीला बोंडे पाती ही राहली नाही त्यामुळे परत पात्या फुले येतील या आशेने शेतकरी हा कपाशीला ओलित करून जीवाचे रान करीत आहे .परंतु शेतातील लाईन राहत नसल्याने पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे पिकाचे नुकसान होत आहे. त्यामुळे दररोज सकाळी ७ ते १ पर्यंत लाईन देण्यांत यावी. असे निवेदन घेऊन उमर्डा येथील नागरिकांनी (Mahavitaran office) महावितरण कार्यालयाल धडक देत उप कार्यकारी अभियंता दहीकर यांना निवेदन देण्यात आले.
गावातील पंपाची लाईन बंद राहत असल्याने लाईन बंद असल्यामुळे संबंधित अधिकारी यांना फोन केला असता शेतकर्यांना उडवाउडवीचे उत्तर देण्यात येते व अपमानजनक भाषा बोलल्या जाते. त्यामुळे आम्ही या नेहमीच्या होणार्या त्रासामुळे त्रस्त झालो आहे. तरी आम्हाला दररोज सकाळी ७ ते १. पर्यंत लाईन देण्यांत यावी. जर आम्हाला पंपाच्या लाईनचा त्रास झाल्यास आम्ही दिनांक ६ नोव्हेंबर पासून आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी देविदास महादेव पांडे, राजू पत्रे ,विलास दत्तुजी बोडे, प्रकाश रामाजी सोयाम संतोष विठ्ठल आत्राम, कृष्णकुमार पुंजाराम सहारे, रुपराव विठोबा चतुर, राजेंद्र अंबादास कोठेकर,किशोर जानराव गावंडे, प्रफुल भिमराव भितकर, ईश्वर रुपरावजी चतुर अरुण किसन भितकर,विवेक देविदास पांडे कुसुमा चतुर आदी उपस्थित होते.
Mahavitaran office: उमर्डा येथील शेतकर्याची महावितरण कार्यालयावर धडक




