कळमनुरी (Kalmanuri Nuribaba Sandal) : कळमनुरी येथील सर्व धर्माचे प्रतीक असलेले हजरत सम्यद नुरोद्दीन नुरी शहीद चिश्ती उर्फ नुरी बाबा यांचे संदल निमित्त भव्य संदल मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक दर्गाचे खादिम खुदरतुल्ला हुसेनी उर्फ खाजा पाशा जहागीरदार यांच्या निवासस्थानापासून काढण्यात आली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध राज्याचे इतर राज्याचे भाविक हजारो च्या संख्येने उपस्थित होते. तसेच (Kalmanuri Nuribaba Sandal) संदल मिरवणुकी दरम्यान जागोजागी कमानी उभारण्यात आले आहे सदर संदल मिरवणूक हे शहरातील विविध मिरवणूक मार्गामध्ये होऊन दर्गाह परिसरात संपत्र होणार आहे.
नुरी बाबा संदल (Kalmanuri Nuribaba Sandal) निमित्त १७ जुलै रोजी शहरात सकाळ पासूनच भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते या वर्षी संदल निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात जाते व अत्यंत साधेपणाने तितक्याच दिमाखदार व शिस्तबद्ध रित्या नुरीबाबांचा संदल २८जुलै रोजी दुपारी काढण्यात आला नुरीभक्ताच्या उपस्थितीत नुरी संदल दरगाह वर पोहचले व मजार शरीफ वर संदल चढविण्यात आला यानंतर सामूहिक प्रार्थना करण्यात आली व महाप्रसाद चे वाटप करण्यात आले संदल कार्यक्रम यशस्वी साठी दरगाह कमिटी व खादीम सय्यद खुदरतुल्ला हुसेनी उर्फ खाजा जहागीरदार यांनी परिश्रम घेतले. मिरवणुकी दरम्यान कोणत्या अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांचे नेतृत्वात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जागोजागी भाविकासाठी लंगर चे आयोजन
नुरी बाबा संदल (Kalmanuri Nuribaba Sandal) मिरवणुकीसाठी येणाऱ्या भाविका साठी गौसियानगर एसबीआय बँक जवळ ,नवीन बस स्टँड, जुना बस स्टँड आधी ठिकाणी मोठ्या प्रमाणे लंगर चे आयोजन करण्यात आले होते.