Parbhani :- परभणीच्या जिंतूर तालुक्यातील पुंगळा येथील पितृछत्र हरवलेल्या निराधार मुलीला लोकसहभागातून संसारोपयोगी मदत करण्यासाठी ‘रुखवत’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विवाहासाठी संपूर्ण संसारोपयोगी साहित्य देऊन मदत करण्यात आली.
विवाहासाठी संपूर्ण संसारोपयोगी साहित्य देऊन मदत
जिंतूर तालुक्यातील पुंगळा येथील एका निराधार विधवा ताईच्या मुलीचा विवाह 20 मे रोजी संपन्न होत आहे. काही वर्षापूर्वी त्या मुलीच्या पित्याचे निधन झाले होते. त्या निराधार ताईला सासू-सासरे नसून माहेरात वडील किंवा भाऊ सुद्धा नाही त्यामुळे निराधार ताई रोजमजुरी करून तिन्ही लेकरांचा उदरनिर्वाह करण्याबरोबरच त्यांना शिकवत आहे. ताईंना एक मुलगी व दोन मुले असून त्यापैकी एक दिव्यांग (disabled) आहे. रोज मजुरी करून उदरनिर्वाह करत असतानाच आता मुलीच्या लग्नाचा खर्च कसा करावा या चिंतेने तिच्या आईला ग्रासले आहे. तिची हलाखीची आर्थिक परिस्थिती पाहता एचएआरसी संस्थेकडे विवाह व संसारोपयोगी मदतीची मागणी केली केली होती. संबंधित एकल पालक व निराधार मुलीची आर्थिक परिस्थिती पाहता होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (Homeopathic Academy of Research and Charities) या संस्थेतर्फे पालकत्व स्वीकारून लोकसहभागातून मदतीचे आवाहन केले होते.
या संस्थेतर्फे पालकत्व स्वीकारून लोकसहभागातून मदतीचे आवाहन केले
मान्यवरांच्या उपस्थितीत रुखवत मांडून तिला सर्वतोपरी मदत करण्यात आली. या रुखवत सोहळा निमित्ताने या सामाजिक उपक्रमास प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत करणारे एचएआरसी संस्थेचे सदस्य, दाते, महिला, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.या आगळावेगळा उपक्रमासाठी यशस्वीततेसाठी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक, डॉ सौ आशा चांडक, प्रकाश डुबे, ऍड चंद्रकांत राजुरे, पदमा भालेराव, शीतल राजुरे, चंद्रकांत जेठुरे, राजेश्वर वासलवार, पांडुरंग पाटणकर, डॉ मंजुषा नरवाडकर , रेणुका तिळकरी, ओम तलरेजा, शिवानी माहुरकर, आशिष लोया, सुहास पेकम आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रयत्न केले.