India vs England 5th test :- ओव्हल कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना चाहत्यांसाठी श्वास रोखून ठेवणारा ठरला. भारताला विजयासाठी फक्त ४ विकेट्सची गरज होती, तर इंग्लंडला ५३ धावांची. दोन्ही संघांनी शेवटच्या तासात चुरशीची झुंज दिली. मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि प्रसिद्ध कृष्णा (Prasiddh Krishna) यांनी निर्णायक गोलंदाजी केली, तर इंग्लंडकडून अॅटकिन्सनने खंबीर झुंज देत सामना अंतिम टप्प्यापर्यंत नेला.
प्रसिद्ध कृष्णा आणि सिराजची जोडी ठरली निर्णायक
या रोमांचक सामन्यात भारताने शेवटी ६ धावांनी विजय मिळवला. सिराजने अखेर अॅटकिन्सनला (Atkinson) १७ धावांवर बाद करत सामना भारताच्या खिशात टाकला. हे कसोटी इतिहासातील सर्वात उत्कंठावर्धक सामने म्हणून ओळखले जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी सिराजने ब्रूकचा झेल टाकला, ज्याचा इंग्लंडने फायदा घेत शतकाच्या स्वरूपात केला. मात्र, सिराजने ही चूक सुधारत एकूण ५ बळी घेतले. प्रसिद्ध कृष्णानेही प्रभावी गोलंदाजी करत ४ विकेट्स घेतल्या. इंग्लंड ३७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत ३६७ धावांवर बाद झाला.
कसोटी मालिकेत १८०० हून अधिक धावा
या कसोटी मालिकेत डावखुऱ्या फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. एकूण धावांपैकी डावखुऱ्या फलंदाजांनी १८३० धावा केल्या, तर उजव्या हाताच्या फलंदाजांनी १७५० धावा केल्या. यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांनी चमकदार कामगिरी केली. विशेष बाब म्हणजे, २००० हून अधिक कसोटी धावा असलेल्या फलंदाजांमध्ये यशस्वी जयस्वालची सरासरी ५० पेक्षा जास्त असून, या विशेष यादीत त्याच्यासोबत सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर यांची नावे आहेत.