वाघाने केली वासराची शिकार
पवनी (Gose Dam) : विदर्भातील महत्वकांक्षी गोसे धरणाखाली मागील काही दिवसांपासून वाघाचे बस्तान असून अनेक पाळीव जनावरांची शिकार केली. दि.८ मे रोजी दुपारी १२ वाजतादरम्यान धरणाखाली टी-पॉईंट सुरक्षा चौकीजवळ वाघाने वासराची शिकार केली. या (Gose Dam) घटनेमुळे सुरक्षा रक्षकांमध्ये तसेच धरणावर ये-जा करणार्या पर्यटकांमध्ये दहशत पसरली आहे.
धरणाखालील टी-पॉईंट चौकीवर सुरक्षा पर्यवेक्षक धनराज बावणे, सुरक्षा रक्षक देवेंद्र झंझाळ, कर्तव्यावर असतांना चौकीच्या अगदी पंधरा-वीस फूट अंतरावर अर्जुन मेश्राम नामक गुराख्याच्या गाईच्या वासरावर पट्टेदार वाघाने झडप घालून शिकार केली. या (Gose Dam) परिसरात आतापर्यंत जवळपास दहा ते बारा पाळीव जनावरांची शिकार केली आहे. वाघाच्या वास्तव्यामुळे सुरक्षा चौकीवर कार्यरत सुरक्षा रक्षकांना धरणावर येणार्या पर्यटकांना धरणात मासेमारी करणार्या मासेमारांना तसेच व्यवसायिकांना जीव मुठीत घेऊन कर्तव्य बजवावे लागते. (Gose Dam) वनविभागाने वाघाला जेरबंद करुन इतरत्र हलविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.