हिसार-तिरुपती रेल्वेला हिंगोली मार्गे ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
हिंगोली (Akola-Poorna Train) : दक्षिणमध्य रेल्वे विभागाच्या वतीने अकोला-पुर्णा मार्गे तिरुपतीसाठी आठवड्यातून पाच रेल्वे धावणार असल्याचे रेल्वे सुत्रांनी सांगितले. तसेच हिसार- तिरुपती रेल्वेला हिंगोली मार्गे ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने प्रवाशांची सोय झाली आहे.
दक्षिण मध्य नांदेड रेल्वे विभागाच्या वतीने हिंगोली व अकोला मार्गे (Akola-Poorna Train) अनेक एक्सप्रेस गाड्या सुरु आहेत. रेल्वे क्रमांक ०७७१७ तिरुपती येथून ९ जुलै बुधवार रोजी रात्री ११ वाजता निघून महेबुब नगर, काचीगुडा, नांदेड, पुर्णा मार्गे दर शुक्रवारी ११ जुलै ते २६ सप्टेंबर पर्यंत वसमत येथे रात्री १२.४५ वाजता, हिंगोली येथे १.३५ वाजता, वाशिम येथे रा९ाी २.१५ वाजता आणि अकोला येथे सकाळी ५ वाजता, शेगाव येथे ५.२८ वाजता पोहचणार आहे. पुढे हि रेल्वे भुसावळ, जळगाव, नंदूरबार, सुरत, बडोदरा, रतलाम, मंदसौर, चित्तोडगढ अर्थात भिलवाडा, अजमेर, फुलेरा, सिकर, झुनझुनू मार्गे हरियाना राज्यातील हिंसार येथे प्रत्येक शनिवारी दुपारी २ वाजता पोहचणार आहे.
तसेच अकोला-पुर्णा मार्गे (Akola-Poorna Train) तिरुपतीला जाणारी रेल्वे गाडी परतीच्या प्रवासात रेल्वे क्रमांक ०७७१८ हिंसार येथून १३ जुलै रविवार रोजी रात्री ११ वाजता निघून आलेल्या मार्गाने दर मंगळवारी १५ जुलै ते २८ सप्टेंबर पर्यंत शेगाव येथे सकाळी ८ वाजता, अकोला येथे सकाळी ८.४५ वाजता, वाशिम येथे सकाळी १० वाजता, हिंगोली येथे सकाळी १०.४० वाजता, वसमत येथे दुपारी ११.३० वाजता व पुढे पुर्णा, नांदेड, काचीगुडा मार्गे तिरुपती येथे दर बुधवारी दुपारी ११.३० वाजता पोहचणार असल्याची माहिती रेल्वे स्टेशन मास्तर पप्पुकुमार व सतिश सुर्यतळ यांनी दिली.
हिंसार-हिंगोली-तिरुपती रेल्वे गाडी २९०० किमी लांबीची धावणार
हिंसार,हिंगोली,तिरुपतीचे संपुर्ण २२ एलएचबी कोच अरक्षित असून त्यात २० वातानुकूलित तृतीय श्रेणी कोच चा समावेश आहे.हि रेल्वे २९०० कि.मी. लांबीचा प्रवास करणार आहे. या हिंसार-हिंगोली-तिरुपती रेल्वे द्वारे मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यातील अनेक धार्मीक स्थळ , पर्यटन व एैतिहासीक स्थळ जोडली गेली आहे. त्यामुळे या रेल्वेला कायमची सोडण्याची मागणी प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष धरमचंद बडेरा, जेठानंद नैनवाणी, सामाजिक कार्यकर्ते गणेश साहू, डॉ. विजय निलावार, माया साहू, प्रविण पडघन, शरद जैस्वाल आदींनी केली आहे.




