Apple iPhone Duo

iPhone Duoची एंट्री! 7.6 इंच स्क्रीन, A20 Pro चिपसेट; जाणून घ्या किंमत

Appleने पहिला फोल्डेबल iPhone Duo लॉन्च केला आहे. 7.6 इंच इनर स्क्रीन, A20 Pro चिपसेट आणि 48MP कॅमेऱ्यासह फोनची सुरुवातीची किंमत ₹2,99,900 आहे.

iPhone Duoची एंट्री! 7.6 इंच स्क्रीन, A20 Pro चिपसेट; जाणून घ्या किंमत

7.6 इंच इनर स्क्रीन, A20 Pro चिपसेट आणि 48MP कॅमेरा; iPhone 18 Pro सीरीजसह Watch Series 12, Ultra 4 आणि AirPods 5ही सादर

Appleने अखेर फोल्डेबल स्मार्टफोनच्या बाजारात प्रवेश करत आपला पहिला फोल्ड होणारा iPhone सादर केला आहे. कंपनीने या नव्या डिव्हाइसला iPhone Duo असे नाव दिले असून, यामध्ये दोन डिस्प्ले देण्यात आले आहेत. फोन फोल्ड केल्यानंतर नेहमीच्या स्मार्टफोनसारखा वापर करता येतो, तर तो उघडल्यानंतर मोठी वाइड स्क्रीन उपलब्ध होते. त्यामुळे फोल्डेबल फोनच्या बाजारात iPhone Duoची थेट स्पर्धा Samsung Galaxy Z Fold 8शी होणार आहे.

iPhone Duoबरोबरच Appleने iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max हे दोन प्रीमियम स्मार्टफोनही बाजारात आणले आहेत. याशिवाय Apple Watch Series 12, Watch Ultra 4 आणि AirPods 5 या उत्पादनांचीही घोषणा करण्यात आली आहे.

iPhone Duoमध्ये 5.4 आणि 7.6 इंचांचे डिस्प्ले

iPhone Duoच्या बाहेरील बाजूस 5.4 इंचांचा कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. डिव्हाइस उघडल्यानंतर 7.6 इंचांची इनर स्क्रीन मिळते. त्यामुळे फोल्ड केलेल्या स्थितीत फोनचा वापर नेहमीच्या स्मार्टफोनप्रमाणे करता येतो, तर अनफोल्ड केल्यानंतर मोठ्या स्क्रीनचा फायदा घेता येणार आहे.

या फोल्डेबल iPhoneच्या बॉडीसाठी एयरोस्पेस ग्रेड टायटेनियम फ्रेम वापरण्यात आली आहे. डिस्प्लेच्या संरक्षणासाठी Appleने Ceramic Shield 2 दिले आहे.

कंपनीच्या माहितीनुसार, iPhone Duoमध्ये देण्यात आलेली हिंज यंत्रणा इतर फोल्डेबल स्मार्टफोनपेक्षा वेगळी आहे. कस्टम व्हेरिएबल टॉर्क प्रोफाइल, कार्बन सपोर्ट प्लेट आणि मॅग्नेट यांच्या सहाय्याने हा हिंज तयार करण्यात आला आहे.

A20 Pro चिपसेटसह 48MP कॅमेरा

परफॉर्मन्ससाठी iPhone Duoमध्ये A20 Pro चिपसेट देण्यात आला असून, हाच चिपसेट iPhone 18 Proमध्येही वापरण्यात आला आहे. कॅमेरा विभागात 48 मेगापिक्सेलचा Fusion Main कॅमेरा मिळतो. त्यासोबत 48 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेराही देण्यात आला आहे.

iPhone Duoची किंमत आणि विक्रीची तारीख

भारतामध्ये iPhone Duoची सुरुवातीची किंमत 2,99,900 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या किमतीत 256GB इंटरनल स्टोरेज मिळते. या फोनची विक्री 23 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

Appleने iPhone Duo दोन रंगांमध्ये सादर केला आहे. यामध्ये नाइटस्काय आणि स्टार व्हाइट या रंगांचा समावेश आहे. फोनच्या टॉप-एंड मॉडेलमध्ये तब्बल 2TB स्टोरेज उपलब्ध असून, त्याची किंमत 4,49,900 रुपये आहे.

iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Maxचीही एंट्री

Appleने iPhone 18 Pro सीरीजमध्ये iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max हे दोन मॉडेल्स सादर केले आहेत. भारतात iPhone 18 Proची सुरुवातीची किंमत 1,64,900 रुपये आहे. तर iPhone 18 Pro Maxसाठी सुरुवातीची किंमत 1,79,900 रुपये ठेवण्यात आली आहे.

या दोन्ही स्मार्टफोनसाठी 12 सप्टेंबरपासून प्री-बुकिंग सुरू होणार आहे.

iPhone 18 Proमध्ये A20 चिपसेट

iPhone 18 Pro सीरीजमध्ये Appleने नवीन A20 चिपसेटचा वापर केला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, हा प्रोसेसर iPhone 17 Proच्या तुलनेत 30 टक्के अधिक वेगवान असून अधिक पॉवर एफिशिएंटही आहे. याशिवाय नव्या सीरीजमध्ये AI आधारित क्षमतांचाही समावेश करण्यात आला आहे.

48MP Fusion Main कॅमेरा आणि व्हेरिएबल अपर्चर

iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max या दोन्ही मॉडेल्समध्ये 48MP Fusion Main कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेऱ्यात व्हेरिएबल अपर्चरची सुविधा उपलब्ध आहे. या वैशिष्ट्यामुळे नव्या iPhone 18 Pro सीरीजला जुन्या iPhone मॉडेल्सच्या तुलनेत वेगळे स्थान मिळते.

Dynamic Islandचा आकार कमी

iPhone 18 Pro सीरीजच्या डिझाइनमध्येही बदल करण्यात आले आहेत. यावेळी Dynamic Island पूर्वीच्या तुलनेत लहान करण्यात आला आहे. Appleने या सीरीजसाठी नवीन रंगही सादर केले असून, Burgundy हा एक्सक्लुझिव्ह रंग उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Apple Watch Series 12 आणि Watch Ultra 4

नव्या iPhone मॉडेल्ससोबत Appleने स्मार्टवॉचच्या नव्या आवृत्त्यांचीही घोषणा केली आहे. यामध्ये Apple Watch Series 12 आणि Apple Watch Ultra 4 यांचा समावेश आहे.

Apple Watch Series 12ची सुरुवातीची किंमत 56,900 रुपये आहे. या सीरीजमधील टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत 1,24,999 रुपये आहे. दुसरीकडे, Apple Watch Ultra 4ची सुरुवातीची किंमत 1,09,900 रुपये असून, त्याच्या टॉप-एंड व्हेरिएंटसाठी 1,24,900 रुपये मोजावे लागतील.

AirPods 5चीही घोषणा

Appleने लॉन्च इव्हेंटमध्ये AirPods 5 देखील सादर केले आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या नव्या इअरबड्समध्ये बेस्ट-इन-क्लास ओपन-इअर अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन फीचर देण्यात आले आहे.

AirPods 5ची सुरुवातीची किंमत 14,900 रुपये असून, वायरलेस चार्जिंग केससह या उत्पादनाची किंमत 17,900 रुपये ठेवण्यात आली आहे.

संबंधित सामग्री

Apple च्या आगामी फ्लॅगशिपमध्ये मिळणार आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी? समोर आली क्षमता

Apple च्या आगामी फ्लॅगशिपमध्ये मिळणार आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी? समोर आली क्षमता

Apple च्या आगामी iPhone 18 Pro Max संदर्भातील नवीन लीकमुळे टेकविश्वात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Jul 04, 2026