छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी

Chhatrapati Sambhaji Maharaj: नातनी धार्मिक संस्था कन्हान क्षेत्रा व्दारे शिवाजी नगर कन्हान येथे राजे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती महाराजाना अभिवादन करुन साजरी

छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी

Chhatrapati Sambhaji Maharaj

कन्हान (Chhatrapati Sambhaji Maharaj: सनातनी धार्मिक संस्था कन्हान क्षेत्रा व्दारे शिवाजी नगर कन्हान येथे राजे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती महाराजाना अभिवादन करुन साजरी करण्यात आली. राजे छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती निमित्त सनातनी धार्मिक संस्था कन्हान क्षेत्रा व्दारे कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी नगर येथे करण्यात आले. कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित संस्थेचे अध्यक्ष शुभम बावनकर, जेष्ठ नागरिक भरत सावळे, मुलचंद शिंदेकर यांच्या हस्ते राजमाता, राष्ट्रमा ता जिजाऊ मां साहेब, छत्रपती शिवाजी महाराज व राजे छत्रपती संभाजी महाराज यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

यावेळी भरत सावळे, मुलचंद शिंदेकर यांनी राजे छत्र पती संभाजी महाराजांचा (Chhatrapati Sambhaji Maharaj) जीवन कार्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपस्थित नागरिकांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन करीत राजे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी जेष्ठ नागरिक भरत सावळे, मुलचंद शिंदेकर, नगरसेवक हरिष तिडके, सनातनी धार्मिक संस्था कन्हान क्षेत्राचे प्रमुख शुभम बावनकर, हिमांशु सावरकर, ऋषभ बाव नकर, वामन येवले, जयराम तिडके, रविसिंग सोलंकी, अशोक रायपुरकर, साहेबराव खेरडे, गीताबाई सावळे , लक्ष्मी सोलंकी, ममता साखरे, कुंती टिकम सह नागरिक उपस्थित होते. 

संबंधित सामग्री

धर्मरक्षणासाठी संभाजी महाराजांच्या बलिदानाची प्रेरणा...

धर्मरक्षणासाठी संभाजी महाराजांच्या बलिदानाची प्रेरणा...

हिंदू धर्मरक्षक, पराक्रमी आणि अद्वितीय शौर्याचे प्रतीक असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाची प्रेरणा घेऊन येत्या गुढीपाडव्याला प्रत्येक घरावर स्वराज्याचा भगवा ध्वज फडकवावा.

Mar 18, 2026