हिंगोली श्री विसर्जन मिरवणुक

हिंगोलीत श्री विसर्जन मिरवणुकीत पोलीस अधिकारी व कर्मचारी बँडच्या तालावर थिरकले..

Hingoli Ganesh immersion: शहरामध्ये दोन दिवसात श्री विसर्जन पार पडले. या बंदोबस्ताच्या ताणतणावातून मुक्त झालेल्या पोलिसांनी रविवारी हिंगोली शहर ठाण्यातील बसविलेल्या श्री चे विसर्जन केले

हिंगोलीत श्री विसर्जन मिरवणुकीत पोलीस अधिकारी व कर्मचारी बँडच्या तालावर थिरकले..

Hingoli Ganesh immersion

हिंगोली (Hingoli Ganesh immersion) : शहरामध्ये दोन दिवसात श्री विसर्जन पार पडले. या बंदोबस्ताच्या ताणतणावातून मुक्त झालेल्या पोलिसांनी रविवारी हिंगोली शहर ठाण्यातील बसविलेल्या श्री चे विसर्जन केले. यानिमित्त काढलेल्या मिरवणुकीत पोलीस अधिकारी व कर्मचारी बँडच्या तालावर थिरकले होते. 

हिंगोली शहरातील वेगवेगळ्या प्रभागात 104 ठिकाणी 14 सप्टेंबरला श्री ची स्थापना करण्यात आली होती सतत बारा दिवस अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रम महाप्रसाद व स्पर्धांसह जनजागृती पर कार्यक्रम घेण्यात आले. हिंगोली शहरातील श्री सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी 25 व 26 सप्टेंबर या दोन दिवसाच्या कालावधीत 104 श्री विसर्जन केले यानिमित्त अनेक ठिकाणी मिरवणूकही काढल्या होत्या. सार्वजनिक गणेश मंडळाच्या (Hingoli Ganesh immersion) श्री चे विसर्जन झाल्यामुळे बंदोबस्ताच्या तणावातून मुक्त झालेल्या पोलिसांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्यातील श्री च्या विसर्जनाची 27 सप्टेंबरला जय तयारी केली होती त्यानिमित्त बँड ढोल ताशाच्या गजरात भव्य विसर्जन मिरवणूक काढली होती.

विसर्जन मिरवणुकीत बँक ढोल ताशाच्या निनादात पोलीस अधिकारी देवेंद्रसिंह ठाकूर यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी थिरकले होते. एरवी शासकीय गणवेशात दिसणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी पिवळा नेहरू शर्ट व पांढऱ्या पॅन्ट मध्ये उठावदार दिसून येत होते. मै हु डॉन च्या गाण्यावर पोलीस अधिकारी ठाकूर यांनी केलेला भन्नाट डान्स हा मात्र अनेकांसाठी लक्षवेधी ठरला. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जड अंतकरणाने श्री चे विसर्जन केले.

संबंधित सामग्री

पोलीस दलात मोठी प्रशासकीय उलथापालथ! १६ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

पोलीस दलात मोठी प्रशासकीय उलथापालथ! १६ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

महाराष्ट्र पोलीस दलात १६ अधिकाऱ्यांच्या बदल्या! ठाण्यातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुदतवाढ; गृह विभागाचा मोठा निर्णय.

Nov 03, 2026
लातूर जिल्ह्यात हेल्मेट सक्ती सर्वांसाठीच!

लातूर जिल्ह्यात हेल्मेट सक्ती सर्वांसाठीच!

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ५८ पोलीस अधिकारी व अंमलदारांवर विनाहेल्मेट दुचाकी चालविल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Aug 29, 2026
चिमुकल्या विद्यार्थिनींनी पोलीस अधिकाऱ्यांना बांधली राखी; संग्राम जाधव यांनी दिले संरक्षणाचे अभिवचन

चिमुकल्या विद्यार्थिनींनी पोलीस अधिकाऱ्यांना बांधली राखी; संग्राम जाधव यांनी दिले संरक्षणाचे अभिवचन

रक्षाबंधनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद केंद्रीय माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींनी सामाजिक बांधिलकी जपणारा अनोखा उपक्रम राबविला.

Aug 28, 2026
शिक्षका प्रमाणे पोलिसांचेही आमदार हवेत-धरणे आंदोलन

शिक्षका प्रमाणे पोलिसांचेही आमदार हवेत-धरणे आंदोलन

Police MLA Protest: पोलिसांच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी शिक्षक  आमदाराप्रमाणे सेवानिवृत्त पोलिसांचे ७ आमदार विधान परिषदेत निर्माण व्हावेत यासाठी सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व अमलदार

Aug 25, 2026
जिल्ह्यातील १२ पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना उत्कृष्ट, अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

जिल्ह्यातील १२ पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना उत्कृष्ट, अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

Hingoli Police Medal: भारत सरकार गृह मंत्रालयाने पोलिस दलातील अधिकारी व अमलदारांच्या दिर्घकालीन, निष्कलंक सेवेची दखल घेण्यासाठी उत्कृष्ट सेवापदक आणि अति उत्कृष्ट सेवा पद जाहीर करण्यात आले

Aug 14, 2026