Share Market Crash

शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण; ४ दिवसांत गुंतवणूकदारांचे ₹१४ लाख कोटी बुडाले

शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण. चार दिवसांत सेन्सेक्स २७०० अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे ₹१४ लाख कोटी बुडाले.

शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण; ४ दिवसांत गुंतवणूकदारांचे ₹१४ लाख कोटी बुडाले

Share Market Crash

सेन्सेक्स २७०० अंकांनी घसरला; अमेरिका-इराण संघर्ष, अमेरिकन बॉण्ड यील्ड आणि विदेशी गुंतवणूकदारांची विक्री ठरली प्रमुख कारणे

मुंबई : भारतीय शेअर बाजारातील घसरणीचे सत्र मंगळवारीही कायम राहिले. आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहारदिवशी सेन्सेक्समध्ये सुमारे ७०० अंकांची घसरण झाली. मागील चार व्यवहार सत्रांचा आढावा घेतला तर सेन्सेक्स तब्बल २७०० अंकांनी खाली आला आहे. या काळात बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य ४८३ लाख कोटी रुपयांवरून सुमारे ४६९ लाख कोटी रुपयांवर आले. परिणामी अवघ्या चार दिवसांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे १४ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

या घसरणीमागे आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचा मोठा प्रभाव असल्याचे दिसत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता संघर्ष, अमेरिकन ट्रेझरी बॉण्डच्या यील्डमध्ये झालेली वाढ आणि विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर्समध्ये सुरू असलेली विक्री यामुळे बाजारावर दबाव वाढला आहे. त्यातच कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढीनेही गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर घातली आहे.

चार दिवसांत सेन्सेक्समध्ये मोठी उलथापालथ

२३ सप्टेंबर रोजी सेन्सेक्स ७४,८२८ अंकांवर बंद झाला होता. त्यानंतर २४ सप्टेंबरला निर्देशांकात तब्बल १,२४७ अंकांची घसरण झाली आणि तो ७३,५८० अंकांवर स्थिरावला.

२५ सप्टेंबरला बाजारात काहीशी सुधारणा दिसून आली. या दिवशी सेन्सेक्स ३१५ अंकांनी वाढत ७३,८९५ अंकांवर बंद झाला. मात्र, ही तेजी फार काळ टिकली नाही. २८ सप्टेंबरला आठवड्याच्या पहिल्याच व्यवहारदिवशी सेन्सेक्समध्ये १,१२४ अंकांची मोठी घसरण झाली आणि निर्देशांक ७२,७७१ अंकांवर आला.

यानंतर २९ सप्टेंबरलाही बाजारातील विक्रीचा दबाव कायम राहिला. सेन्सेक्स सुमारे ७०० अंकांनी घसरून ७२,०६४ अंकांच्या आसपास आला. डिसेंबर २०२५ मध्ये सेन्सेक्सने ८६,१५९ अंकांचा उच्चांक गाठला होता.

दरम्यान, निफ्टी ५० मध्येही मागील चार दिवसांत मोठी घसरण झाली आहे. २३,४४६ अंकांवरून निफ्टी ५० सुमारे २२,५६९ अंकांपर्यंत खाली आला. म्हणजेच या कालावधीत निफ्टीमध्ये ८७७ अंकांची घट झाली आहे. या वर्षभरात निफ्टीमध्ये १५ टक्क्यांची घसरण झाल्याचे आकडेवारीतून दिसून येते.

कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

शेअर बाजारातील दबावामागील प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे कच्च्या तेलाच्या दरातील वाढ. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे प्रस्ताव फेटाळल्याचे सांगितले जात आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.

या परिस्थितीचा परिणाम तेलाच्या पुरवठ्यावर होण्याची शक्यता निर्माण झाल्याने कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. भारत हा जगातील मोठ्या तेल आयातदार देशांपैकी एक असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल महागल्यास त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारावर होऊ शकतो. कच्च्या तेलाचा दर १०७ डॉलर प्रति औंसपर्यंत गेल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अमेरिकन बॉण्ड यील्डचा बाजारावर दबाव

अमेरिकेच्या १० वर्षांच्या ट्रेझरी यील्डमध्येही वाढ झाली असून ती ५.२ टक्क्यांच्या वर गेल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकन बाँडमधील परतावा वाढल्यास डॉलर आधारित गुंतवणूक तुलनेने आकर्षक ठरू शकते. त्यामुळे विकसनशील देशांमधील विदेशी गुंतवणुकीवर दबाव येण्याची शक्यता असते.

याशिवाय बॉण्ड यील्ड आणि कच्च्या तेलाच्या किमती दोन्ही वाढल्यामुळे जागतिक महागाईबाबतची चिंता वाढू शकते. महागाईचा दबाव कायम राहिल्यास जगभरातील केंद्रीय बँकांकडून व्याजदर तुलनेने उच्च पातळीवर ठेवले जाण्याची शक्यता निर्माण होते. या घटकांचाही इक्विटी बाजारातील गुंतवणूकदारांच्या भावनेवर परिणाम होत आहे.

विदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात विक्री

भारतीय शेअर बाजारातील घसरणीत विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची विक्री हा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे. सप्टेंबर महिन्यात २५ सप्टेंबरपर्यंत विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय इक्विटीमध्ये २५,६८२ कोटी रुपयांची विक्री केली आहे.

याच कालावधीत विदेशी गुंतवणूकदारांनी प्राथमिक बाजारातील म्हणजेच IPO मध्ये ८,५५१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्यामुळे दुय्यम बाजारातील विक्रीचा दबाव आणि जागतिक आर्थिक परिस्थिती यांचा एकत्रित परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे.

संबंधित सामग्री

डिझेल खरेदीवर मोठी मर्यादा! Jio-BP पंपांवर 50 लिटरची कमाल सीमा; Nayara Energyचाही पुरवठा नियंत्रित

डिझेल खरेदीवर मोठी मर्यादा! Jio-BP पंपांवर 50 लिटरची कमाल सीमा; Nayara Energyचाही पुरवठा नियंत्रित

Jio-BPच्या काही पंपांवर डिझेल खरेदी 50 लिटरपुरती मर्यादित; Nayara Energyवरही निर्बंध. सरकारी तेल कंपन्यांच्या पंपांवर मात्र सध्या विक्री सुरळीत.

Sep 24, 2026
सौदीची तेल पाइपलाइन बंद; कच्च्या तेलाचा भाव १०९ डॉलरवर, भारताच्या पेट्रोल-डिझेल दरवाढीची चिंता

सौदीची तेल पाइपलाइन बंद; कच्च्या तेलाचा भाव १०९ डॉलरवर, भारताच्या पेट्रोल-डिझेल दरवाढीची चिंता

सौदी अरेबियातील ड्रोन हल्ल्यानंतर १,२०० किमी लांबीची पूर्व-पश्चिम तेल पाइपलाइन तात्पुरती बंद झाली. कच्च्या तेलाचा भाव १०९ डॉलरवर पोहोचल्याने भारताच्या इंधन दरांबाबत चिंता वाढली.

Sep 12, 2026
पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण

Petrol-Diesel Prices: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत गेल्या तीन महिन्यांतील सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. मध्य पूर्वेतील तणाव काहीसा कमी होण्याची चिन्हे दिसू लागल्याने तेलाचे दर

Jul 28, 2026
Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी

Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी

आठवड्याच्या अखेरच्या व्यवहाराच्या दिवशी, म्हणजेच शुक्रवार (10 जुलै) रोजी भारतीय शेअर बाजाराने दमदार सुरुवात केली.

Jul 10, 2026
अमेरिका–इराण करारानंतर बाजारात मोठी तेजी; सेन्सेक्स 1300 अंकांनी झेपावला, निफ्टी 24 हजारांवर

अमेरिका–इराण करारानंतर बाजारात मोठी तेजी; सेन्सेक्स 1300 अंकांनी झेपावला, निफ्टी 24 हजारांवर

अमेरिका आणि इराण यांच्यातील कराराची अधिकृत घोषणा झाल्यानंतर जागतिक आर्थिक बाजारात मोठे बदल दिसून आले आहेत.

Jun 15, 2026