शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु होण्याची प्रतीक्षा
बारव्हा (Lakhandur Paddy Harvesting) : लाखांदूर तालुक्यात अवकाळी पावसासह रोगराईने धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. जे काही धान पीक या खरीप हंगामात शेतात उभे आहे. अशा धान पिकाची कापणी आता जोरात सुरू झाली आहे. अनेक शेतकर्यांच्या शेतातील धानपीक मळणीसाठी तयार असून काही ठिकाणी (Lakhandur Paddy Harvesting) मळणीलाही सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांचे लक्ष आता शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रांकडे लागले आहे. मात्र कापणी झालेल्या धानाची विक्री करण्यासाठी अजूनही शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु न केल्याने नेमके केव्हा सुरू होणार? असा गंभीर प्रश्न शेतकर्यांसमोर उभा ठाकला आहे.
लाखांदूर तालुक्यात कोणतेही मोठे उधोगधंदे नसल्याने येथील शेतकर्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. मात्र तोही व्यवसाय निसर्गावर अवलंबून असल्याने बिन भरोसाचा झाला आहे. परिणामी लावलेली पुंजीही निघण्याची अपेक्षा नसते. यंदाच्या खरीप हंगामात नक्षत्रचे पाऊस वेळेवर पडल्याने शेतकर्यांनी वेळेवर शेतीची मशागत, रोवणी वेळेवर केली. यंदा शेतातील पीक (Lakhandur Paddy Harvesting) बघितले तर चांगली फसल हातात येण्याची अपेक्षा शेतकर्यांना होती.
मात्र अचानक आलेल्या अवकाळी पावसाने व लागलेल्या रोगराईने शेतातील उभे धानाचे पीक फस्त केले. अनेकांचे शेतातच अवकाळी पावसामुळे धान पडल्याने व पाणी शेतात साचल्याने धान पीक पाण्याखाली येऊन सडली. यात (Lakhandur Paddy Harvesting) शेतकर्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. जे काही शेतात धानाचे पीक उरले आहे. त्याची सद्या जोरात कापणी व मळणी सुरु आहे.
मात्र आधारभूत खरेदी केंद्र सुरु न झाल्याने मळणी केलेले धान तसेच शेतकर्यांच्या घरी उघड्यावर पडून आहेत. समोर दिवाळी सारखा सण पुढे असून आपली गरज भागविण्यासाठी खाजगी व्यापार्यांना कवडीमोल भावात धान विकावे लागत असल्याने यात शेतकर्यांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. तरी शासन- प्रशासन यांनी याकडे लक्ष देऊन आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.
मोजणीसाठी ‘लूट’ आणि पैशाची मागणी थांबणार का?
मागील खरेदी हंगामात अनेक आधारभूत केंद्रांवर धान मोजणीच्या वेळी केंद्र चालकांकडून शेतकर्यांची खुलेआम लूट करण्यात आल्याच्या तक्रारी होत्या. (Lakhandur Paddy Harvesting) धान मोजणीसाठी शेतकर्यांकडून पैशाची मागणी केली जात होती. तसेच, प्रत्येक क्विंटलमागे ४ ते ५ किलो अतिरिक्त धानाची कपात केली जात होती. १०० किलो धानाची खरेदी करतांना केवळ ९५ किलोचे पैसे दिले जात होते. यामुळे शेतकर्यांचे दुहेरी आर्थिक नुकसान झाले होते. या हंगामात तरी जिल्हा मार्केटिंग अधिकारी या गंभीर गैरव्यवहाराकडे लक्ष देणार काय? अशा या गैरप्रकारांना कठोरपणे पायबंद घालावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.