मूल (Ethanol Company Case) : मूल तालुक्यातील एमआयडीसीत असलेल्या इथेनॉल कंपनीमध्ये मशिनमध्ये सापडुन मजुराचा मृत्यु झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. रसिक रमेश गेडाम (२०) रा. राजगड असे मृतक मजुराचे नांव आहे.
मूल तालुक्यातील एमआयडीसी परिसरात असलेल्या (Ethanol Company Case) कार्निवल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमीटेड मध्ये इथेनालचे उत्पादन घेतले जात आहे. दरम्यान शनिवारी सकाळी मजुर वर्ग काम करीत असताना बिहार येथील राजेंद्र यांच्याकडे मजुर म्हणुन काम करीत असलेल्या रसिक रमेश गेडाम, रा. राजगड हा मशीन बंद करण्यासाठी वरच्या मजल्यावर गेला होता.
दरम्यान रसिकचे शर्ट मशीन मध्ये सापडला, शर्ट काढण्याचा प्रयत्न रसिकने केला मात्र शर्ट न निघता हातासह तोच मशिनमध्ये गेल्याने गंभीर दुखापत झाली. कंपनी प्रशासनाने (Ethanol Company Case) त्याला तात्काळ मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला मृत घोषीत केले. उत्तरीय तपासणी नंतर रसिकचे मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केले. राजगड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.