१ लाख ८४ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त
गडचिरोली (Illegal Liquor Sellers) : धानोरा तालुक्यातील नवेगांव येथे गडचिरोली पोलीस व कारवाफा पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवित ८ दारूविक्रेत्यावर कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख ८४ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई (Illegal Liquor Sellers) काल २५ जुलै रोजी करण्यात आली.
या प्रकरणी प्रभुदास शिशु गावडे(४० ), पंचफुला सुरेश नरोटे(४२ ) , मनिषा केशव तुमरेटी (५०), निलिमा वसंत तुमरेटी ( ३५), दिलीप शिशु गावडे (३२ )े, अशोक तुळशिराम पदा (४७), जैराम बुधाजी गावडे (५८) ,परसुराम पांडुरंग तुमरेटी ( ४४) सर्व रा. नवेगाव ता. धानोरा यांचे विरुध्द संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे गडचिरोली येथे कलम ६५ (इ), ६५ (एफ), महा. दा. का. अन्वये ०८ वेगवेगळे (Illegal Liquor Sellers) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्यांचा पुढील तपास गडचिरोली पोलीसांकडुन करण्यात येत आहे.