गुन्हे शोध पथकाची कारवाई, ३२ मशिन्ससह सात लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त
हिंगणघाट (Hinganghat Crime) : शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या इलेक्ट्रॉनिक क्वॉईन मशिन, गेम पार्लरवर कारवाई करत ३२ क्वॉईन मशिन्ससह सात लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या (Hinganghat Crime) प्रकरणी पोलिसांनी १५ जणांवर गुन्हे दाखल केले. ही कारवाई येथील पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली.
गुन्हे शोध पथक गस्त करत असताना, हिंगणघाट शहरातील दवाखाना चौक तसेच गोलबाजार परिसर येथे लगत असलेल्या टिनाच्या दुकानात इलेक्ट्रॉनिक क्वॉईन मशीनवर चाबीचा वापर करून मशिनवर नमुद असलेल्या नंबरवर पैशे लावून हारजितीचा जुगार खेळ खेळत असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. त्यावरून छापा टाकला असता, (Hinganghat Crime) इलेक्ट्रॉनिक क्वॉईन मशीनवर चाबीचा वापर करून मशिनवर नमुद असलेल्या नंबरवर पैसे लावून जुगार खेळत असताना आर्दश गवळी, विजय रघाटाटे, किशार तेलकोजवार, संजय सोनकुसरे मिळून आले.
दुकान मालक प्रमोद मुंढे पसार आहे. १० इलेक्ट्रॉनिक क्वॉईन मशीन व इतर साहित्य असा २ लाख ६४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दुसरी कारवाई गोलबाजार परिसरात करण्यात आली. गोलबाजार परिसरात इलेक्ट्रॉनिक क्वाईन मशीनवर चाबीचा वापर करून मशिनवर नमुद असलेल्या नंबरवर पैसे लावून पैशाचा हारजितीचा जुगार खळ खेळत असताना आरोपी आशिष पाराशर, अनंता भिमनवार, शेख नबी, ईरफान खॉन, राजा मखरे, गजानन कारवटकर असे मिळुन आले. त्यांच्या ताब्यातून १५ इलेक्ट्रॉनिक क्वॉईन मशीन व इतर असा २ लाख ९० हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तिसरी कारवाई गोलबाजार परिसरात करण्यात आली. येथे टिनाच्या दुकानात इलेक्ट्रॉनिक क्वाईन मशीनवर चाबीचा वापर करून मशिनवर नमुद असलेल्या नंबरवर पैसे लावून जुगार खेळताना विशाल माथनकर, रितश खहतकर, अर्पित मेंढे, गौरव मडावी असे मिळून आले. त्यांच्या ताब्यातून ७ इलेक्ट्रॉनिक क्वॉईन मशीन व इतर असा २ लाख २२ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तिन्ही गुन्ह्यांमध्ये ७ लाख ७७ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Hinganghat Crime) तिन्ही कारवाईमध्ये आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे.
या कारवाई पोलीस अधिक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक देवेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार प्रशांत ठोबरे, राजेश शेंडे, मंगेश वाघमारे, आशिष नेवारे, रोहीत साठे, सहायक पोलिस निरीक्षक दीपक वानखेडे, हवालदार अनुप टपाले, गणेश वैद्य, असमि शेख, विवके वाकळे, पराग आत्राम, राजेंद्र ढगे, कृष्णा माने, संतोष लोहटे, दीपक हाके, पोलिस उपनिरीक्षक सुनिल राम, पोलिस हवालदार प्रविण बावणे, नरेंद्र आरेकर, निलेश सुर्यवंशी, संतोष गिते, सागर सागाल यांनी केली.
