व्ही.एस. पँथर्सच्या मागणीला यश; सातत्याने केला पाठपुरावा
लातूर (Statue of Knowledge) : लातूर शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क परिसरात स्टॅच्यू ऑफ नॉलेज म्हणजेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ७५ फुटी पुतळा उभारण्यास मंजुरी मिळाली असून सदर पुतळा उभारण्याच्या कामास तात्काळ प्रशासकीय मान्यता देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. याबाबत व्ही. एस. पँथर्स युवा संघटनेने संस्थापक विनोदभाऊ खटके यांच्या नेतृत्वाखाली 20 मार्च 2023 रोजी भव्य महामोर्चा काढला होता. तसेच कालच पालकमंत्री भोसले यांना याबाबत संघटनेचे शिष्टमंडळ भेटले होते.
व्ही. एस. पॅंथर्सचा (Statue of Knowledge) मोर्चा निघाल्या दिवशीच औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी दूरध्वनीद्वारे मोर्चेकर्यांशी बोलताना नॉलेज ऑफ स्टॅच्यू उभारणीसाठी मंजुरी मिळाली आहे, असे आश्वस्त केले होते. त्यानंतर वारंवार संघटनेने महापालिका आयुक्त यांना निवेदन देऊन ही मागणी लावून धरली होती. मागच्या महिन्यामध्ये लातूर दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनाही याबाबत निवेदन देऊन या मागणीचा पाठपुरावा केला होता. त्यानंतर मराठवाडा मुक्ती संग्राम दिना दिवशी शासकीय विश्रामगृहात संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद किनीकर यांनी पुन्हा एकदा (Statue of Knowledge) नॉलेज ऑफ साठी निवेदन दिले आणि पालकमंत्र्यांनी निर्देश दिल्यामुळे व्ही. एस. पँथर्सच्या सातत्यपूर्ण मागणीला यश मिळाले आहे.
दिलासा आणि प्रेरणा देणारा निर्णय…
लातूर शहराच्या सौंदर्यात भर टाकणारा आणि आंबेडकरी जनतेला दिलासा आणि प्रेरणा देणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुतळा उभारण्याच्या निर्णयाला विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. लातूर महानगरपालिकेच्या माध्यमातून हा पुतळा उभारण्यासाठी १० कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळून सदर निधी मनपाकडे वर्ग झालेला आहे. मात्र (Statue of Knowledge) पुतळा उभारण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे, असे कालच संघटनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पालकमंत्र्यांनी तात्काळ प्रशासनास याबाबतचे निर्देश देण्याची ग्वाही शिष्टमंडळाला दिली होती. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया विनोदभाऊ खटके यांनी दैनिक देशोन्नतीशी बोलताना दिली.