Yawatmal :- दारव्हा रोडवर असलेल्या सर्व्हिस रोड वर झालेल्या अतिक्रमणाचा (encroachment) आढावा मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांनी ग प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन घेतला होता संबंधित ठिकाणी अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांच्यां जागेच्या कागदांची तपासणी करून पुढील दिशा ठरवली जाईल अशी भूमिका मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांनी त्यावेळी घेतली होती. यावेळी याठिकाणी, नगर अभियंता अमोल गवळी उपस्थित होते न.पच्या अधिकार्यांनी दारव्हा नाका ते लोहारा चौकापर्यंत संपूर्ण रस्त्याची पाहणी करून लवकरात पुढील कारवाईला सुरुवात करणार असल्याचे सुतोवाच केले होते.
मालाची चढ-उतार करण्यासाठी अवजड वाहनांची वर्दळही वाढत असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊनच मार्ग काढावा लागत आहे
मात्र ही कारवाईच झाली नसल्याचे मुख्याधिकारी याचा अतिक्रमण काढण्याचा निर्णय थंड बस्त्यात पडला आहे. नियमानुसार याठिकाणी झालेल्या अतिक्रमणावर कारवाईची गरज असतानाही या ठिकाणी होत नसलेली कारवाई विविध प्रश्न उपस्थित करून जात आहे. शहरातील रस्ते आधीच अरुंद आहेत. त्यात अतिक्रमणांची भर पडल्याने चालणेही कठीण झाले आहे. यातून शहरात अपघाताच्या (Accident) घटना घडत आहेत. शहरातील प्रमुख व्यापारी संकुलांलगतच्या रस्त्यांवरून नागरिकांना चालणेही अवघड झाले आहे. शहरातील दारव्हा नाका ते लोहारा चौक आर्णी रोड, धामणगाव रोड लोहारा वाघापूर बायपास आदी भागांतील मोठ्या दुकानांचा माल दुकानाबाहेर लावण्यात येतो. मालाची चढ-उतार करण्यासाठी अवजड वाहनांची वर्दळही वाढत असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊनच मार्ग काढावा लागत आहे.
शहरातील दारव्हा रोडवरील सबवे व इतर काही भागातील सबवे संपूर्ण पणे व्यापारांनी काबीज केले असून शासनाच्या रस्त्यांवर अतिक्रमण करून आपले व्यवसाय सुरू केले आहे त्या सबवेचा कुठल्याही प्रकारचा कर या व्यापार्यांना भरावा लागेत नाही त्यामुळे जवळपास १२ मिटरचे रस्ते कधी गडप झाले हे पहायला प्रशासनाला सुध्दा वेळ नाही.