कृषीमाल खरेदी-विक्रीसह कामकाज व व्यवस्थापनाची जाणून घेतली माहिती!
बुलढाणा (Agricultural Bazar Samiti) : कृषीप्रधान भारत देशात कृषी व्यवस्था सांभाळण्यात महिलाच अग्रेसर असतात, कृषीविषयक शिक्षणासाठी मुलींचा सहभागही आता कमालीचा वाढला आहे. एग्रीकल्चर एज्युकेशन (Agricultural Education) मध्ये गुणवत्तेत मुलीच अग्रेसर दिसत आहे. बुलढाणा येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्न डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालयात शिकत असलेल्या मुली कृषीविषयक कार्यामध्ये सदैव अग्रेसर असतात, या कृषीकन्यांनी नुकतीच स्थानिक (Agricultural Bazar Samiti) कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन कृषी माल खरेदी-विक्रीसह, मालाची साठवणूक करण्यासाठी असलेली गोडाऊन व्यवस्था यासह शेतकऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था व अन्य बाबींची माहिती घेऊन व्यवस्थापन व कामकाजाविषयी जाणून घेतले.
भारत हा कृषिप्रधान देश असून देशाची अर्थव्यवस्था शेती व शेतीसंबंधी उत्पन्न तथा उत्पादनावर अवलंबून आहे. कृषीमाल उत्पादित होत असताना पूर्वी त्याला बाजारपेठ नव्हती, परिणामी प्रचंड परिश्रम करूनही शेतकऱ्यांना पाहिजे तेवढा आर्थिक लाभ होत नव्हता. शेतकऱ्यांची ही लूट थांबविण्यासाठीच सहकार व पणन कायद्याअंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती यांची स्थापना झाली. या (Agricultural Bazar Samiti) बाजार समितीचे कामकाज कसे चालते ? याची प्रात्यक्षिकासह माहिती घेण्यासाठी गोडे कृषी महाविद्यालयातील पुनम बाहाकार, साक्षी अहिरे, कल्याणी देशमुख, वैभवी बोरकुटे, साक्षी भोयर आदी कृषीकन्यांनी बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीला 22 जुलै रोजी भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Agricultural Bazar Samiti) अध्यक्ष जालिंदर बुधवत, सचिव वनिता साबळे यांनी या कृषीकन्यांचे स्वागत करून त्यांना संपूर्ण परिसर दाखवत चालू असलेल्या कामांविषयी शैक्षणिकदृष्ट्या माहिती दिली. यासाठी या (Colleges of Agriculture) कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश वाघ, कार्यक्रम अधिकारी प्रा. शुभम सराफ, प्रा. रवी शेळके, प्रा. नितीन राठोड यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.