विभागीय युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी साधला कृषिमंत्र्यांसोबत संवाद!
बार्शीटाकळी (Agricultural Officer) : विभागीय पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी यांनी, राज्याचे कृषिमंत्री दत्तामामा भरणे (State Agriculture Minister Datta Mama Bharane) यांची संवाद साधून बार्शीटाकळी तालुका कृषी अधिकारी संध्याताई कारवा हया शासकीय योजना व शेतकरी हिताकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक देत नसून शेतकरी हिताचे कामे करीत नाहीत. त्यामुळे त्यांची तात्काळ इतरत्र बदली करण्यात यावी. अशा गंभीर स्वरूपाची तक्रार राज्याचे कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांचेकडे केली. तसेच राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालयाने सदर प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्र्याकडून चौकशीचे आदेश!
बार्शीटाकळी तालुक्यातील महागाव येथील प्रगतिशील, विभागीय युवा पुरस्कार प्राप्त शेतकरी ज्ञानेश्वर ढोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे दिनांक 10 ऑगस्टला तक्रार केल्यानंतर, काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांची मंत्रालयात प्रत्यक्षपणे भेट घेतली. सदर तक्रारीतून त्यांनी बार्शीटाकळी तालुक्यात 161 गावातील जनता मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत. 80% च्या वर शेतकरी हे सेंद्रिय पद्धती शेती करत आहेत. शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी तालुकास्तरावर तालुका कृषी कार्यालयाची निर्मिती केली असून, या विभागाअंतर्गत शेतकरी हितांच्या विविध कल्याणकारी योजना अस्तित्वात आहेत. तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील तालुका कृषी अधिकारीसंध्या कारवा यांचेकडे जर तालुक्यातील शेतकरी काही कामानिमित्त गेले, तर ते त्यांच्यासोबत सन्मानपूर्वक वागणूक देत नसुन अपमानास्पद बोलतात. शेतकऱ्यांना शेतीविषयक कोणत्या योजना ची माहिती मिळत नाही. तसेच त्यांचे अधिनस्त असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत सुद्धा त्या अशा प्रकारची वागणूक देतात.
..तर शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली असती, परंतु तसे झाले नाही!
काही दिवसापूर्वी शासनाने (Government) शेतकऱ्यांना दिलेल्या कृषी निविष्ठा सदर कार्यालयाअंतर्गत जाळण्यात आल्या होत्या. निविष्ठा जर शेतकऱ्यांच्या बांधावर पोचल्या असत्या किंवा शेतकऱ्यांना (Farmers) मिळाल्या असत्या, तर शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली असती. परंतु तसे झाले नाही. तालुका कृषी अधिकारी यांची तात्काळ बार्शीटाकळी तालुक्यातून इतरत्र बदली करण्यात यावी. अशा प्रकारची तक्रार दत्तामामा भरणे यांची प्रत्यक्षात भेट घेऊन चर्चा करण्यात आली आहे. अशा प्रकारची माहिती ज्ञानेश्वर ढोरे यांनी दैनिक देशोन्नतीशी बोलताना दिली आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचे कार्यालयाकडून संबंधित विभागाला याबाबत तात्काळ चौकशीचे आदेश दिलेले आहेत.
मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्रस्ताव!
यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी संध्याताई कारवा यांना विचारणा केली असता, त्यांनी महागावातील जय गजानन सार्थक शेती गटाने खरेदी केलेले ड्रम व इतरनिविष्ठाचे जीएसटी बिल नसल्यामुळे प्रस्ताव अपूर्ण असल्याने परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात बाबत बार्शीटाकळीचे मंडळ अधिकारी श्रीमती भोसले यांना सांगितले. त्यांनी दिनांक 15 ऑगस्ट रोजी मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्रस्ताव टपालमध्ये सादर केल्यानुसार सहायक तंत्र व्यवस्थापक आत्मा यांना तपासणी करून सादर करण्याबाबत सूचित केले आहे. अशा प्रकारची माहिती त्यांनी दिली.
स्वतःवर कारवाई होऊ नये म्हणून त्या बचावाचा प्रयत्न!
यासंदर्भात तक्रारदार ज्ञानेश्वर ढोरे पाटील म्हणाले की, तालुका कृषी अधिकारी चुकीची व दिशाभूल करणारी माहिती देऊन वेळ निभावून नेण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वतःवर कारवाई होऊ नये म्हणून त्या बचावाचा प्रयत्न करत असून त्यांच्या काळातील विविध कामाची सखोल चौकशी केल्यास सत्य उघड होईल.




