कृषि विभागाच्या भरारी पथकाची धडक कार्यवाही!
वर्धा (Agricultural Service Centre) : कृषि विभागाच्या वतीने कृषि केंद्रांची तपासणी (Agricultural Center Inspection) मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेदरम्यान, कृषि केंद्रातील पॉस मशिन व प्रत्यक्ष साठा यात तफावत आढळून आल्याने १७ कृषि केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. ही कारवाई कृषि विभागाच्या भरारी पथकाने जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्या नेतृत्वात केली.
१५ कृषि सेवा केंद्राचे रासायनिक खत व २ बियाणे विक्री परवाने निलंबित!
तालुका गुणनियंत्रण निरिक्षक आणि जिल्हा भरारी पथकामार्फत तपासणीत आढळून आलेल्या अनियमिततेबाबत परवाना अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे सुनावणी घेण्यात आली. त्यामध्ये १५ कृषि सेवा केंद्राचे रासायनिक खत व २ बियाणे विक्री परवाने निलंबित (Sales Licenses Suspended) करण्यात आले. त्याचबरोबर ११ कृषि सेवा केंद्रांना सक्त ताकिद देण्यात आल्या. रासायनिक खत परवाने निलंबित करण्यात आलेल्या कृषि केंद्रामध्ये जैन कृषि केंद्र रोहणा, तुळजा कृषि केंद्र वाढोणा, महाकाली अॅग्रो एजन्सी तळेगाव (र), संकेत कृषि केंद्र समुद्रपूर, संत भोजाजी महाराज कृषि केंद्र समुद्रपूर, शंकर कृषि केंद्र समुद्रपूर, गायत्री सिड्स वर्धा, शालिनी कृषि सेवा केंद्र कारंजा, माऊली अॅग्रो एजन्सी तळेगाव आष्टी, विधी अॅग्रो एजन्सी गिरोली, साहिल कृष केंद्र मांडगाव, कृषि सेवा केंद्र अल्लीपूर, आदर्श कृषि सेवा केंद्र वडनेर, साई सुविधा सेवा कृषि केंद्र सावली वाघ, संत भोजाजी महाराज कृषि केंद्र अल्लीपूरचा तर श्री बालाजी अॅग्रो एजन्सी कानगाव व हटवार कृषि केंद्र कानगाव या कृषि सेवा केंद्राचा बियाणे विक्री परवाना केंद्राचा समावेश आहे.
- जिल्ह्यात युरियाची टंचाई होऊ नये म्हणुन २ हजार ३०० मेट्रीक टन इतका साठा संरक्षित करुन ठेवण्याचे लक्षांक आहे. त्यानुसार २ हजार १७२.५० मेट्रीक टन युरिया संरक्षित करण्यात आला आणि दोन टप्प्यात संपूर्ण साठा मुक्त करण्यात आला असून तो कृषि सेवा केंद्रावर उपलब्ध आहे. जिल्ह्यातील शेतकर्यांनी युरिया खताच्या उपलब्धतेबाबत आश्वस्त व्हावे, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. नलिनी भोयर यांनी कळविले आहे.
- या कार्यवाही, तपासणीत जिल्हा भरारी पथक प्रमुख कृषि विकास अधिकारी शिवा जाधव, जिल्हा गुणनियंत्रण निरिक्षक प्रमोद पेटकर, तालुका गुणनियंत्रण निरिक्षक महेंद्र डोफे, पंकज लांडे, रमेश वाघमारे, प्रशांत भोयर, जोत्सना घरत, राजश्री चाफले, शुभ्रकांत भगत व गजानन पुसदेकर यांनी सहभाग नोंदविला होता.
- पॉस मशिनवर शिल्लक दिसत असूनही काही कृषी सेवा केंद्रांनी खताची विक्री पॉस मशिनद्वारे न करता परस्पर विक्री केल्याने तसेच विक्रीतील अनियमिततेमुळे या केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. कृषी सेवा केंद्र चालकांनी दर्शनी भागात भाव फलक आणि साठा फलक ठेवणे, पॉस मशिनद्वारेच खताची विक्री करणे, साठा पुस्तक वेळोवेळी अद्यावत ठेवणे, खतांची नोंद करणे बंधनकारक आहे, अशा सूचना सर्व कृषी निविष्ठा विक्रेते यांना कृषी विभाग मार्फत देण्यात आल्या आहेत.