मुंबई (Ahmednagar Railway Station) : महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस सरकारने आता अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नाव बदलले आहे. लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या सन्मानार्थ हे रेल्वे स्टेशन ‘अहिल्यानगर’ (Ahilyanagar Railway Station) म्हणून ओळखले जाईल. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने हे नाव बदलण्याची अधिसूचना जारी केली होती. या बदलाला दुजोरा देत मध्य रेल्वेने म्हटले आहे की, पूर्वी (Ahmednagar Railway Station) ‘अहमदनगर’ म्हणून ओळखले जाणारे स्टेशन आता अधिकृतपणे ‘अहिल्यानगर’ असे म्हटले जाईल. रेल्वेने असेही स्पष्ट केले की, स्टेशन कोडमध्ये कोणताही बदल होणार नाही आणि अहिल्यानगरचा कोड ‘ANG’ राहील.
गेल्या महिन्यात, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून शहराच्या नवीन नावानुसार स्टेशनचे नाव बदलण्याची विनंती केली होती. शहराचे नाव अहिल्यानगर (Ahilyanagar Railway Station) असल्याने, अनेक संघटना आणि नागरिक रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्याची मागणी करत होते. पूर्वी, विविध केंद्रीय विभागांमध्ये अहमदनगर असे नाव नोंदणीकृत असल्याने नागरिकांना सरकारी कामात गैरसोय होत होती. परंतु आता केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मान्यतेने ही समस्या सोडवण्यात आली आहे.
स्टेशन कोड बदलला जाणार नाही
मध्य रेल्वेने सांगितले की पुणे विभागातील या (Ahmednagar Railway Station)स्टेशनचे नाव ‘अहिल्यानगर’ असे ठेवण्यात आले आहे. परंतु, स्टेशन कोड ‘ANG’ मध्ये कोणताही बदल होणार नाही. हा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या अधिसूचनेवर आणि भारताच्या सर्व्हेअर जनरलच्या पत्रावर आधारित आहे.
नाव बदलाची घोषणा कधी?
अहिल्यादेवींच्या 300 व्या जयंतीनिमित्त या नामांतराची प्रक्रिया सुरू झाली. 31 मे 2024 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौंडी येथे अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ असे ठेवण्याची घोषणा केली. त्यानंतर अहमदनगर महापालिकेला नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रशासकीय राजवटीत प्रशासकीय महासभेत नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. नंतर, महसूल आणि वन विभागाने 8 ऑक्टोबर 2024 रोजी अहमदनगर शहर, उपविभाग आणि जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर (Ahilyanagar Railway Station) असे बदलण्याची अधिसूचना जारी केली.
17 सप्टेंबर रोजी बीड-अहिल्यानगर दरम्यान पहिली रेल्वे
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी अमळनेर-बीड दरम्यान नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले. या प्रसंगी, बीड-अहिल्यानगर दरम्यानची पहिली रेल्वे गाडी हिरवा झेंडा दाखवून रवाना केली जाईल, जी अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पाचा भाग आहे.