अमरावती (Ajay Veer Jakhar) : भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी 1955 मध्ये स्थापन केलेल्या शेतकर्यांच्या गैर-राजकीय, वर्गविरहित (Bharat Krishak Samaj) भारत कृषक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजय वीर जाखड (Ajay Veer Jakhar) यांना नागपूर येथे नुकत्याच झालेल्या कृषी विकास प्रतिष्ठानच्या राष्ट्रीय परिषदेत ‘राष्ट्रीय सन्मान पुरस्कार’ (National Award) व एक लाख रुपयांच्या रोख बक्षीसाने सन्मानित करण्यात आले. जाखड यांचे नाव देशातील प्रगतीशील शेतकर्यांमध्ये अभिमानाने घेतले जाते.
पंजाबमधील अबोहर या गावात इस्त्राईल तंत्रज्ञानाच्या पद्धतीने शेती केली जाते. भारतातील विविध प्रांतातील व परदेशातील शेतकरी तंत्रज्ञान शिकण्यासाठी, जाणून घेण्यासाठी व समजून घेण्यासाठी त्यांच्या शेताला भेट देत राहतात.
भारत कृषक समाजाचे महाराष्ट्र राज्य संघटक डॉ. वसंत लुंगे यांनी समस्त महाराष्ट्राच्या शेतकर्यांच्यावतीने जाखड यांना शुभेच्छा दिल्या व मिळालेली रोख रक्कम शेतकर्यांच्या हितासाठी खर्च करण्यात येईल. या प्रसंगी पद्मविभूषण मा. डॉ. अनिल काकोडकर सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ, डॉ. सी.डी. मायी सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ, मा. डॉ. वेदप्रकाश मिश्रा, मा. विजय जावंधिया आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक गिरीष गांधी यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन श्रीमती फडणवीस यांनी केले.