नाशिक (Akhil Brahmin Sanstha) : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था आणि समाज सहाय्यक संस्था नाशिकच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सवानिमित्त संस्थेच्या अभ्यंकर सभागृहात सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचा (Atharvashirsha Pathan) कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी हेमलता अमृतकर, उज्वला वाणी, जयश्री मेणे, शैलजा वाणी, स्वाती मेतकर या पौरोहित्य करणाऱ्या महीलांच्या मार्गदर्शनाने सर्व उपस्थितांनी एकसुरात अथर्वशीर्षाचे पठण केले.
संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम सर्व समाजासाठी राबविले जातात. नाशिक शहरातील अनेक गणेशभक्त या सामुदायिक (Atharvashirsha Pathan) अथर्वशीर्षाच्या पठणासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पठणापुर्वी श्री सुहास भणगे यांच्याहस्ते सत्यविनायक पुजन करण्यात आले. (Akhil Brahmin Sanstha) कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यवाह सुभाष सबनीस यांनी केले. पठणानंतर महाआरती झाली प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष उदयकुमार मुंगी,कोषाध्यक्ष अनिल देशपांडे, उल्हास पंचाक्षरी, सुहास शुक्ल, गंगाधर कुलकर्णी, प्रविण कुलकर्णी सुहास भणगे, ॲड. समीर जोशी चंद्रशेखर जोशी, विश्वास पारनेरकर सुनील भणगे यांच्यासह सभासद आणि गणेशभक्त उपस्थित होते.