सुखी संसाराचे स्वप्न पार धुळीस मिळाले…
अकोला (Akola Crime) : पती-पत्नी.. दोन चिमुकल्या मुली असा सुखी संसार असलेल्या दहीगाव गावंडे येथील नवलकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळेल, असे स्वप्नातही वाटत नसताना केवळ एका चुकीमुळे क्षणातच होत्याचे नव्हते झाले. निमित्त होते फक्त दुचाकीच्या चाकात साडीचा पदर अडकण्याचे. त्या एका क्षणाने तीन जीव पोरके झाले तर दुसरीकडे सुखी संसाराचे स्वप्न पार धुळीस मिळाले. या (Akola Crime) घटनेमुळे संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे.
माहितीनुसार, दहीगाव गावंडे येथील आशिष नवलकर हे ४ फेब्रुवारीला पत्नी पल्लवी, दोन चिमुकल्या मुली (दोन वर्ष आणि ११ महिने वयांच्या) हे दुचाकीने दोनद येथील आसरा मातेच्या दर्शनासाठी घरून निघाले होते. घरून हसतखेळत निघालेल्या या कुटुंबाबाबत नियतीच्या मनात काही वेगळेच होते. दर्शन घेऊन परत येत असताना आशिषची पत्नी पल्लवीचा पदर कधी दुचाकीच्या चाकात अडकला हे तिच्या लक्षातच आले नाही. पदर चाकात आणखी गुरफटत गेल्याने पल्लवी अचानक गाडीवरून खाली कोसळली. यात (Akola Crime) तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली. तातडीने तिला (Akola Hospital) अकोल्याच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. दोन चिमुकल्या मुलीही जखमी झाल्या होत्या. मात्र, पल्लवीच्या डोक्याला मार असल्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक होती. तीन दिवस मृत्यूशी झुंज देत अखेर ७ फेब्रुवारीला तिची ही झुंज संपली. तिच्या अशा निधनामुळे संपूर्ण समाजमन हादरले तर एकाच वेळी दोन चिमुकल्या मुलींसह पती असे तीन जीव पोरके झाले. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती.
खबरदारी घेतली असती तर…!
पोलिस (Akola Police) प्रशासनाद्वारे नेहमीच वाहतुकीबाबत सुरक्षिततेसंबंधी संदेश देण्यात येत असतात. आपण सर्वच जण त्याकडे सोईस्करपणे डोळेझाक करीत असतो. त्यांच्या साध्या-साध्या सूचनांचे पालन केले तर (Akola Crime) मोठ्या दुर्घटना सहज टळू शकतात, हा धडा दहीगाव गावंडे येथील घटनेने दिला आहे. त्या महिलेने थोडी जरी खबरदारी घेतली असती तर कदाचित हा अपघात टळू शकला असता. ह्या जर-तरच्या गोष्टी असल्या तरी वाहन चालविताना प्रत्येकाने खबरदारी घ्यायलाच हवी, एवढे मात्र निश्चित.