शेतकऱ्यांना पॉलिसीचे वाटप करताना मान्यवर
देशोन्नती वूत्तसंकलन
चिखली (PM Pik Bima Yojana) : भारतीय कृषी विमा कंपनी अंतर्गत पिक विमा पॉलिसी वितरण कार्यक्रम राबवण्यात आला यावेळी मा. काकडे साहेब तहसीलदार चिखली व श्री सुरडकर साहेब तालुका कृषी अधिकारी चिखली, कुलकर्णी साहेब कृषी अधिकारी चिखली, लंबे साहेब मंडळ कृषी अधिकारी अमडापूर, कंकाळ साहेब मंडळ कृषी अधिकारी शेलसुर, शेळके साहेब कृषी पर्यवेक्षक शेलसुर तसेच पिक विमा कंपनी तालुका समन्वयक नंदकिशोर जोगदंडे, प्रफुल्ल रावे, गजानन सुरडकर, शंकर परीहार, तुषार डोंगरे, योगेश जाधव यांच्या हस्ते पॉलिसीचे उपस्थित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली. मेरी पॉलिसी मेरे हाथ पिक विमा पॉलिसी वितरण करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत पिक विमा योजने बाबत शेतकऱ्यांना माहिती व मार्गदर्शन देण्यात आले.